शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : कोव्हॅक्सिनचा डेटा ‘हू’, अमेरिकेला सादर करणार- डॉ. व्ही. के. पॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 06:47 IST

Corona Virus: पंतप्रधानांच्या टास्क फोर्सचे (लस) प्रमुख डॉ. व्ही.के. पॉल यांनी अनेक प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले की, ‘जागतिक आरोग्य संघटना लस पासपोर्टचा विषयही हाती घेईल.

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि अमेरिकेकडून (यूएसएफडीए) येत असलेल्या वाढत्या दडपणानंतर केंद्र सरकारने कोव्हॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील  चाचणीची माहिती आता कोणत्याही दिवशी जाहीर करू, अशी घोषणा शुक्रवारी केली.याबाबतचा डेटा हू, अमेरिकेला लवकरच सादर केला जाणार आहे.

पंतप्रधानांच्या टास्क फोर्सचे (लस) प्रमुख डॉ. व्ही.के. पॉल यांनी अनेक प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले की, ‘जागतिक आरोग्य संघटना लस पासपोर्टचा विषयही हाती घेईल. कोव्हॅक्सिन ६० देशांना पुरविण्यात आली आहे. परंतु, यूएसएफडीएने त्याला मान्यता देण्यास नकार दिला आणि ज्यांनी कोव्हॅक्सिन लस घेतली त्यांचा आंतरराष्ट्रीय प्रवास होईल की नाही, अशी परिस्थिती त्यामुळे निर्माण झाली आहे.’ जागतिक आरोग्य संघटनाही भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनची माहिती मागत आहे.

 डॉ. पॉल म्हणाले, ‘प्रत्येक देशाला त्याच्या त्याच्या आवश्यकतांनुसार आणि चाचणीच्या माहितीच्या गरजांनुसार लस स्वीकारायची की नाकारायची याचा हक्क आहे. आम्ही विदेशी लसींच्या चाचण्या घेतो. आम्ही भारत बायोटेकला या विषयाकडे लक्ष द्या, असे सांगितले आहे.’ कोविशिल्ड आणि स्पुतनिक व्ही या लसींनी त्यांच्या टप्पा तिसऱ्या चाचणीची माहिती दिली असताना भारत बायोटेक लिमिटेडने का खुली केली नाही, असे विचारल्यावर डॉ. पॉल यांनी खात्री दिली की, ‘ती कोणत्याही वेळी दिली जाईल.’ डॉ. पॉल म्हणाले, ‘जागतिक आरोग्य संघटना लस पासपोर्टचा विषय हाताळत आहे.’ कोव्हॅक्सिनची सुमारे २५ हजार ८०० लोकांशी संबंधित ‘क्लिनिकल ट्रायल मोड’ परिणामकारकता माहिती अजून सादर झालेली नाही. 

६० पेक्षा जास्त देशांत मान्यतेच्या प्रक्रियेतकोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता मिळणे म्हणजे भारतीय लस विकसित करण्यास उत्तेजनही मिळेल. कारण किमान आणखी सहा भारतात विकसित झालेल्या लसी चाचण्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. कंपनीने या आधी म्हटले होते की, अमेरिका, ब्राझील आणि हंगेरीसह ६०पेक्षा जास्त देशांत कोव्हॅक्सिन नियामक मान्यतेच्या प्रक्रियेत आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या