शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेणा कोरोना व्हायरस फुफ्फुस अन् किडनी शिवाय, 'या' दोन महत्वाच्या अवयवांनाही करू शकतो 'Damage'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 21:31 IST

कोरोना व्हायरस शरीराच्या नेमक्या कोणकोणत्या अवयवांसाठी घातक आहे अथवा शरीराच्या कोणकोणत्या अवयवांवर प्रामुख्याने हल्ला करू शकतो, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याचे उत्तर दिले आहे मौलाना आझाद मेडिकल कॉलेजचे डॉक्‍टर नरेश गुप्‍ता यांनी.

ठळक मुद्देकोरोना व्हायरस शरीराच्या कोणकोणत्या अवयवांवर प्रामुख्याने हल्ला करू शकतो, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहेकोरोना व्हायरस हा मानवाच्या चार महत्वाच्या अवयवांवर हल्ला करू शकतो, असे डॉक्‍टर नरेश गुप्‍ता यांनी म्हटले आहेहा व्हायरस मानवाच्या शरीरात गेल्यानंतर सर्वप्रथम फुफ्फुसावर हल्ला करतो

नवी दिल्‍ली - जीवघेण्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. हा व्हायरस रोज शेकडो लोकांचे बळी घेत आहे. यामुळे सर्वत्र भीतीचे वातारण आहे. अशा परिस्थितीत, हा व्हायरस शरीराच्या नेमक्या कोणकोणत्या अवयवांसाठी घातक आहे अथवा शरीराच्या कोणकोणत्या अवयवांवर प्रामुख्याने हल्ला करू शकतो, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याचे उत्तर दिले आहे मौलाना आझाद मेडिकल कॉलेजचे डॉक्‍टर नरेश गुप्‍ता यांनी. हा व्हायरस श्वासोच्छ्वास माध्यमाने शरीरात प्रवेश करतो आणि एक, दोन नव्हे, तर तब्बल चार अवयवांवर प्रामुख्याने हल्ला करतो, असे गुप्ता यांनी सांगितले.

'या' चार अवयवांवर करतो  प्रामुख्याने हल्ला -डॉ. गुप्ता म्हणाले, कोरोना व्हायरस शरीरात गेला, की तो प्रामुख्याने फुफ्फुस, श्वसन प्रणाली, मूत्रपिंड (किडनी) आणि आतडे यांना हानी पोहोचवतो. यापूर्वी, हा व्हायरस मुत्रपिंडालाही हानी पोहोचवतो, असे जर्मनीच्या एका रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले होते. तेही खरे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र या व्हायरसमुळे फुफ्फुसाला जेवढी हानी पोहोचते तेवढी मुत्रपिंड अथवा आतड्यांना पोहोचत नाही, असेही त्यांनी सांगितले. ते ऑल इंडिया रेडिओला दिलेल्या एका मुलाखतीत बोलत होते.

हा व्हायरस मानवाच्या शरीरात गेल्यानंतर सर्वप्रथम फुफ्फुसावर हल्ला करतो. याच्या प्रवेशानंतर फुफ्फुसात सूज येते आणि न्‍यूमोनियाची लक्षणे दिसू लागतात. याशिवाय तो शरीराच्या इतर भागांतही जाऊ शकतो. जसे, आतडे, मुत्रपिंड इत्यादी. फुफ्फुसावर याचा हल्ला सर्वप्रथम होतो आणि तो येथेच सर्वाधिक नुकसान करतो. यामुळेच रुग्णाला ऑक्‍सिजन आणि व्हेन्टिलेटरची आवश्यकता भासते. 

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने आतापर्यंत 3 लाख 2 हजार 956 नमुने तपासले आहेत. देशातील सरकारी आणि खासगी तपासणी केंद्रांवर काल 27 हजार 256 नमुने तपासण्यात आले आहेत. डिसेंबर 2019मध्ये चीनमधील हुबेई प्रांताची राजधानी वुहानमधूल या व्हायरसचा जन्म झाला. आज त्यांने संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरdelhiदिल्लीMaharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्य