शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

Corona Vaccine: कोणत्याही लसीपासून 100% संरक्षण नाही, बुस्टर डोसबाबत चाचपणी सुरू; निति आयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 6:34 AM

Corona Vaccine Update: कोणत्याच लसीपासून १०० टक्के संरक्षण मिळत नाही. त्यामुळे जर बुस्टर डोसची आवश्यकता असेल तर तसे जनतेला कळविले जाईल, असे निति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : कोणत्याच लसीपासून १०० टक्के संरक्षण मिळत नाही. त्यामुळे जर बुस्टर डोसची आवश्यकता असेल तर तसे जनतेला कळविले जाईल, असे निति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे.त्यांनी सांगितले की, कोरोना विषाणूपासून अधिक संरक्षण मिळावे यासाठी बूस्टर डोसची गरज आहे का, याविषयी सध्या अभ्यास सुरू आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही सर्व प्रतिबंधक नियम पाळणे आवश्यक आहे. लसीमुळे कोरोनापासून काही प्रमाणात संरक्षण मिळेल; मात्र तरीही प्रत्येकाने सावध राहायला हवे. कोणतीच लस रोगापासून १०० टक्के संरक्षण देत नाही, हे नेहमीच लक्षात ठेवावे.डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, देशातील कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या लसींचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भारत बायोटेक या कंपनीने आपली उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी काही पावले उचलली आहेत. काही महिन्यांतच ही कंपनी दर महिन्याला १० कोटी लसींचे उत्पादन करू शकेल. सिरम कंपनीही लवकरच दर महिन्याला ११ कोटी लसींचे उत्पादन करणार आहे. 

फायझरची लस जुलैमध्ये उपलब्ध होण्याची शक्यतानीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, फायझर कंपनी त्यांची लस भारतामध्ये जुलै महिन्यात उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे. ही लस मिळविण्याबाबत फायझर कंपनीशी केंद्र सरकार सध्या चर्चा करीत आहे. लोकांना लस दिल्यानंतर त्यातून उद्भवणारे वाद व कायदेशीर कारवाईपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी फायझरने केंद्र सरकारकडे केली आहे. याबाबत व्यापक जनहित लक्षात घेऊनच केंद्र सरकार निर्णय घेईल. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसNIti Ayogनिती आयोगcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यIndiaभारत