Corona vaccine : कोविशिल्डच्या दुसऱ्या मात्रेमधील अंतर वाढले, पण दोन्ही डोस घेणाऱ्यांचे काय? तज्ज्ञ म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 15:23 IST2021-05-15T15:22:22+5:302021-05-15T15:23:15+5:30
Corona vaccination in India: कोविशिल्डच्या दुसऱ्या मात्रेसाठीचे अंतर १२ ते १६ आठवडे एवढे निर्धारित करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत ज्यांनी कोविशिल्डच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत त्यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.

Corona vaccine : कोविशिल्डच्या दुसऱ्या मात्रेमधील अंतर वाढले, पण दोन्ही डोस घेणाऱ्यांचे काय? तज्ज्ञ म्हणतात...
नवी दिल्ली - देशात कोरोनाविरोधातील लसींची टंचाई निर्माण झालेली असतानाच कोविशिल्डच्या लसीच्या दोन मात्रांमधील अंतर वाढवण्यात आले आहे. (Corona vaccination in India) आता कोविशिल्डच्या (Covishield ) दुसऱ्या मात्रेसाठीचे अंतर १२ ते १६ आठवडे एवढे निर्धारित करण्यात आले आहे. दोन मात्रांमधील अंतर वाढवल्याने लस अधिक प्रभावी ठरते, असा तर्क त्यामागून देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत ज्यांनी कोविशिल्डच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत त्यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. अशा व्यक्तींना दिलासा देणारी माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली आहे. ( The distance between the second dose of Covishield increased)
कोविड वर्किंग ग्रुपचे चेअरमन डॉ. एन.के. अरोडा यांनी सांगितले की, ज्यांनी कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यांना घाबरण्याची गरज नाही. मीसुद्धा कोविशिल्डचे दोन्ही डोस चार आठवड्यांच्या अंतराने घेतले आहेत.
त्यांनी सांगितले की, जे लोक लस घेत आहेत, त्यांच्यावर सरकारकडून लक्ष ठेवले जात आहे. अॅस्ट्रजेनेकाची लस भारत आणि यूकेमध्ये दिली जात आहे. तसेच समोर येत असलेल्या नव्या माहितीच्या आधारावर आम्ही निर्णय घेत आहोत. गेल्या आठवड्यात आम्हाला यूकेमधून नवा डेटा मिळाला आहे. त्याच्या आधारावर नव्या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच कोविशिल्डच्या दोन मात्रांमधील अंतर वाढवून १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण अंतर वाढल्याने लसीचा प्रभावही वाढत आहे.
डॉ. अरोडा यांनी सांगितले की, कोरोनाची दुसरी लाट येईल हे लोकांना माहिती होते. मात्र ही लाट इतकी भीषण असेल, अशी कुणालाही कल्पना नव्हती. या दुसऱ्या लाटेमागे नवा व्हेरिएंट (बी.१.६१७) आहे. तहा एक आरएनए विषाणू आहे. त्याचा अर्थ तो सतत म्युटेट होत राहील.
दरम्यान, भारत बायोटेकच्या लसीचे लहान मुलांवर होत असलेल्या परीक्षणाबाबत त्यांनी सांगितले की, सप्टेंबर महिन्यापर्यंत या चाचणीचे निष्कर्ष समोर येतील. तसेच वर्षाच्या अखेरीच लहान मुलांचेही लसीकरण सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.