Corona Vaccine : ...अन् भाजपा आमदाराने केलं कोरोना नियमांचं उल्लंघन; घरीच घेतली लस 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 09:09 AM2021-04-14T09:09:48+5:302021-04-14T09:12:33+5:30

Corona Vaccine And BJP MLA : देशात लसीकरण मोहीम ही वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी लसीकरणासाठी लोक मोठी रांग लावत आहेत.

Corona Vaccine bjp mla from bihar got vaccinated at his home being criticized for this | Corona Vaccine : ...अन् भाजपा आमदाराने केलं कोरोना नियमांचं उल्लंघन; घरीच घेतली लस 

Corona Vaccine : ...अन् भाजपा आमदाराने केलं कोरोना नियमांचं उल्लंघन; घरीच घेतली लस 

Next

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) काही दिवसांपूर्वी कोरोनावरील लस (Corona Vaccine) घेतली. मोदींनी नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. यानंतर मोदींनी जनतेला कोरोना लस घेण्याचं आवाहनही केलं. तसेच आपण देशाला कोरोनामुक्त करू असा निर्धारदेखील त्यांनी व्यक्त केला आहे. यानंतर अनेक नेतेमंडळींनी देखील लस घेतली आहे. देशात लसीकरण मोहीम ही वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी लसीकरणासाठी लोक मोठी रांग लावत आहेत. तर काही ठिकाणी लसीचा तुटवडा असल्यामुळे नागरिकांना लस देखील उपलब्ध होत नसल्याचं समोर येत आहे. मात्र असं असताना बिहारमधीलभाजपा आमदाराने चक्क घरीच लस (Corona Vaccine) घेतल्याची घटना आता समोर आली आहे. 

बिहारमधीलभाजपाच्या एका आमदाराने कोरोना नियमांचं उल्लंघन करत थेट डॉक्टरांनाच आपल्या घरी बोलावून घेत स्वतःचे लसीकरण करून घेतल्याचा प्रकार आता समोर आला आहे. भाजपाच्या या आमदारावर सर्वच स्तरातून जोरदार टीका होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक सिंह असं या आमदाराचं नाव आहे. अशोक यांनी कोरोना लसीकरणासाठी रूग्णालय किंवा लसीकरण केंद्रावर न जाता डॉक्टरांनाच स्वतःच्या घरी बोलावून घेतले होते. याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये वैद्यकीय कर्मचारी भाजपा आमदारास त्याच्या घरीच लस देताना पाहायला मिळत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

...अन् भाजपा मंत्र्याने घरीच घेतली कोरोना लस; यात काय चुकीचं आहे? म्हणत केला अजब खुलासा 

 कर्नाटकचे मंत्री बी. सी. पाटील (BC Patil) यांनी देखील कोरोनावरील लस घेतली होती. पण पाटील यांनी सरकारी केंद्रात न जाता घरीच लस घेतल्याची माहिती समोर आली होती. कर्नाटकचे मंत्री बी. सी. पाटील यांनी घरी कोरोना लस घेतल्याने नवा वाद निर्माण झाला होता. घरी लस का घेतली याबाबत पाटील यांनी अजब खुलासा केला. कोरोनावरील लस असुरक्षित आहे, ही नागरिकांमधील भीती दूर करण्यासाठी आपण रुग्णालयामध्ये जाण्याऐवजी घरीच लस घेतली असं पाटील यांनी म्हटलं होतं. तसेच मी रुग्णालयामध्ये जाऊन लस घेतली असती तर आपल्यामुळे इतर नागरिकांना ताटकळत राहावं लागलं असतं. मात्र इथे मी नागरिकांनाही भेटू शकतो आणि लसही घेऊ शकतो. यात चुकीचं काय आहे? असं पाटील यांनी म्हटलं होतं.

कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, ब्राझीलला मागे टाकत भारत दुसऱ्या स्थानी

भारतातही कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून ब्राझीलला मागे टाकत कोरोनाग्रस्त देशांच्या आकडेवारीत भारत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. देशात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा दर 90% टक्क्यापेक्षा कमी झाला आहे. अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विश्वविद्यालयाच्या (JHU) आकडेवारीनुसार, सर्वाधिक बाधित रुग्णांच्या बाबतीत भारतानेस ब्राझीलला मागे टाकलं आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 1,34,82,023 रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेत सर्वाधिक 3,11,98,055 रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. तर, जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 13 कोटी 61 लाखांवर पोहोचला आहे.

 

Web Title: Corona Vaccine bjp mla from bihar got vaccinated at his home being criticized for this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.