Corona vaccine: कोरोनावर आणखी एक औषध, राेश इंडिया-सिप्ला यांचे अँटिबॉडी कॉकटेल भारतात उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 07:01 IST2021-05-25T06:40:17+5:302021-05-25T07:01:55+5:30
Corona vaccine News: आता राेश इंडिया आणि सिप्ला यांच्यातर्फे विकसित करण्यात आलेले अँटिबॉडी कॉकटेल बाजारात दाखल झाले आहे.

Corona vaccine: कोरोनावर आणखी एक औषध, राेश इंडिया-सिप्ला यांचे अँटिबॉडी कॉकटेल भारतात उपलब्ध
नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत चालल्याचे संकेत आहेत. मात्र, तोपर्यंत व्हायची ती हानी झालेली आहे. अशात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनबरोबर स्पुतनिक व्ही ही लसही बाजारात आली आहे. त्यात आता राेश इंडिया आणि सिप्ला यांच्यातर्फे विकसित करण्यात आलेले अँटिबॉडी कॉकटेल बाजारात दाखल झाले आहे.
अँटिबॉडी कॉकटेल कशापासून बनले?
- कॅसिरिव्हीमॅब आणि इम्डेव्हिमॅब यांच्यापासून हे अँटिबॉडी कॉकटेल बनले आहे
- सिप्लाच्या वितरण प्रणालीच्या माध्यमातून हे कॉकटेल उपलब्ध होऊ शकते
- देशात आपत्कालीन वापरासाठी या कॉकटेलला अलीकडेच मंजुरी मिळाली
अमेरिका आणि युरोपीय समुदाय या ठिकाणी अँटिबॉडी कॉकटेलला ज्या डेटाच्या आधारावर मंजुरी मिळाली त्याच्याच आधारे सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनने (सीडीएससीओ) मंजुरी दिली
कोणाला कॉकटेल द्यावे
-हे अँटिबॉडी कॉकटेल १२ वर्षावरील रुग्णाला दिले जावे. रुग्णाचे वजन कमीत कमी ४० किलो असावे
- त्याचबरोबर संंबंधित व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झालेले हवे
- कोरोना असलेल्या परंतु वैद्यकीय प्राणवायूची
गरज न भासणाऱ्यास हे कॉकटेल देता येते
किती खर्च येईल
- एका रुग्णाला अँटिबॉडी कॉकटेलच्या एका मात्रेसाठी ५७,७५० रुपये खर्च.
- एक डोस १२०० मिलिग्रॅमचा असून त्यात ६०० मिग्रॅ कॅसिरिव्हीमॅब आणि ६०० मिग्रॅ इम्डेव्हिमॅब आहे
- कॉकटेलच्या मल्टीडोस पॅकची किंमत १,१९,५०० रुपये आहे.
- या मल्टीडोस पॅकने दोन रुग्णांवर उपचार करता येतात, असा कंपनीचा दावा आहे