शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
3
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांना भाजपाला इशारा
4
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
5
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
6
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
9
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
10
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
11
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
12
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
13
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
14
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
15
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
16
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
17
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
18
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
19
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
20
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?

शंभर कोटी डोसचा टप्पा उद्या होणार पूर्ण; केंद्र सरकार ऐतिहासिक क्षण मोठ्या प्रमाणावर साजरा करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 6:43 AM

ऐतिहासिक क्षण मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा मोदी सरकारचा बेत

- हरीश गुप्तानवी दिल्ली :  देशभरात राबविल्या जात असलेल्या  कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना लसीचे ९९ कोटी डोस देण्यात आले असून, गुरुवारी, २१ ऑक्टोबर रोजी भारत एक अब्ज डोसचा (१०० कोटी)  टप्पा पार करणार आहे. एका ऐतिहासिक क्षण मोठ्याप्रमाणावर साजरा करण्याचा मोदी सरकारचा बेत आहे.सणासुदीमुळे मागच्या आठवड्यात लसीकरणाचा मोहीम धीमी पडल्याने मागच्या आठवडाभरात फक्त १.३२ कोटी डोस देता आले. सोमवारपासून लसीकरणाला गती आली असून सोमवारी सायंकाळपर्यंत ८७.२३ कोटी डोसचा टप्पा गाठला. भारताने मंगळवारी पात्र लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या डोसचा टप्पा ९९ कोटी पार केला. मंगळवारी सांयकाळपर्यत ३९ लाख डोस देण्यात आले. बुधवारी मोठा सण असल्याने लसीकरणासाठी अनेक लोक स्वत:हून  न येण्याची शक्यता वाटते. त्यामुळे १०० कोटी डोसचे उद्दिष्ट गाठण्यात समस्या येऊ शकते. त्यामुळे १०० कोटी डोसचा पल्ला गुरुवारी गाठण्यासाठी आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी दिवसभरात बैठका घेण्यात व्यस्त होते. मागच्या  संपूर्ण आठवडाभरात  लसीकरणाची गती कशी धीमी पडल्याचे  तक्त्यावरून दिसेल.सोमवारपासून लसीकरणाने गती पकडली आहेउत्तर प्रदेश (१२ कोटी) आणि महाराष्ट्राने (९.२ कोटी) आतापर्यंत पात्र लाभार्थ्यांना डोस देण्यात मोठे यश मिळविले आहे. दिल्लीसह इतर राज्य सर्व प्रौढांना लसीचा पहिला डोस देण्यात यशस्वी झाले आहेत.चीननंतर भारत लसीकरणात ऐतिहासिक टप्पा गाठणारा  जगातील पहिला देश असेल. अमेरिकेला जेमतेम ४०  कोटी डोसचा पल्ला गाठता आला; परंतु,  भारताने ७० कोटी लोकांना लसीचा पहिला डोस देऊन मोठी मजल गाठली.१०० कोटी डोसचे उद्दिष्ट ७ ऑक्टोबर रोजी साध्य करता आले असते, परंतु, कमी पुरवठा झाल्याने लांबले.लसींमुळे इतर काेराेना विषाणूंविराेधातही संरक्षण मिळतेवाॅशिंग्टन : जगाला काेराेना महामारीने गेल्या दीड वर्षांपासून वेठीस धरले आहे. महामारीतून बाहेर पडण्यासाठी काेविड १९ प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. या लसी तसेच पूर्वी झालेला काेविड १९ विषाणूचा संसर्ग याचप्रकारच्या इतर विषाणूंपासून संरक्षण देत असल्याचे एका संशाेधनातून आढळून आले आहे.‘जरनल ऑफ क्लिनीकल इन्व्हेस्टीगेशन’ मासिकामध्ये यासंदर्भात संशाेधनातील निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यातून सार्वत्रिक काेराेना प्रतिबंधक लस विकसित हाेऊ शकते का, याबाबत तर्कसंगत अभ्यास करण्यात आला. तुम्हाला एका काेराेनाविषाणूचा संसर्ग झाल्यास इतर काेराेना विषाणूंपासून संरक्षण मिळू शकेल का? याबाबत संशाेधन करण्यात आले. लसीकरण कार्यक्रमदि.     रोजचे डोस    एकूण     (लाखात)    (कोटीत)१३    ३७.०८    ९६.८२१४    ३१.२८    ९७.१४१५    ९.२४    ९७.२३१६    ४२.७५    ९७.६५१७    १२.८५    ९७.७९ १८    ८७.२३    ९८.६७१९    ३९.०२

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या