Corona vaccination : भारताच्या कोरोानाविरोधातील लढाईला मोठं यश, अशी कामगिरी करणारा बनला जगातील पहिला देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 16:10 IST2021-05-10T16:05:12+5:302021-05-10T16:10:40+5:30
Corona vaccination in India: कोरोनाचा फैलाव वाढू लागल्यानंतर कोरोनाविरोधातील लसींची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.

Corona vaccination : भारताच्या कोरोानाविरोधातील लढाईला मोठं यश, अशी कामगिरी करणारा बनला जगातील पहिला देश
नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यातच कोरोनाचा फैलाव वाढू लागल्यानंतर कोरोनाविरोधातील लसींची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. (Corona vaccination in India) मात्र वाढत्या मागणीच्या तुलनेत लसींचा पुरवाठा कमी होत असल्याने देशात कोरोना लसींची टंचाई निर्माण झाल्याचे चित्र आहे. मात्र असे असले तरी देशात आतापर्यंत १७ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. (CoronaVirus Positive News) ११४ दिवसांत १७ कोटी नागरिकांचे लसीकरण करणारा भारत हा जगातील पहिला देश बनल आहे. (India becomes first country in world to vaccinate 170 million people in less days)
१७ कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी चीनला ११९ दिवस तर अमेरिकेला १५५ दिवस लागले. भारतामध्ये १६ जानेवारी रोजी लसीकरणाची सुरुवात झाली होती. सुरुवातीला आरोग्यसेवेतील कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, ६० वर्षांवरील नागरिक, ४५ वर्षांवरील नागरिक आणि आता १८ ते ४४ वर्षांवरील नागरिक यांच्या लसीकरणाला टप्प्याटप्प्याने सुरुवात झाली आहे. तेव्हापासून आतापर्यंत एकूण १७ कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
आज सकाळी ७ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशातील एकूण १७ कोटी, १ लाख, ७६ हजार ६०३ जाणांचे लसीकरण झाले आहे. देशातील एकूण लसीकरणापैकी ६६.७९ टक्के लसीकरण हे महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळ, बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये झाले आहे.