शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
4
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
5
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
6
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
7
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
8
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
9
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
10
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
11
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
12
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
13
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
14
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
15
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
16
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
17
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
18
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
19
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
20
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?

Corona Vaccination: कोरोनाविरोधातील लसीच्या बुस्टर डोसची किती गरज? AIIMS चे संचालक डॉ. गुलेरियांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 14:54 IST

Corona Vaccination in India: भारताने कोरोनावरील लसीच्या बुस्टर डोसबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. यादरम्यान, एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाविरोधातील लसीच्या तिसऱ्या डोसबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

नवी दिल्ली - गेल्या पावणे दोन वर्षांपासून सुरू असलेला कोरोना विषाणूच्या संसर्गाचा फैलाव अद्याप कमी झालेला नाही. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सध्या प्रत्येकाला कोरोनाविरोधातील लस दिली जात आहे. भारतात कोरोनाविरोधातील लसीकरणाची मोहीम जोरात सुरू आहे. (Corona Vaccination in India) तर अमेरिका, ब्राझीलसह जगातील अनेक देशांमध्ये लसीचा तिसरा म्हणजेच बुस्टर डोस दिला जात आहे. मात्र भारताने कोरोनावरील लसीच्या बुस्टर डोसबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. यादरम्यान, एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाविरोधातील लसीच्या तिसऱ्या डोसबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. (Coronavirus vaccine booster dosage is not required in India at present,  The Director of AIIMS, Dr. Guleria made it clear)

एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, भारतामध्ये सध्यातरी बुस्टर डोस देण्याची गरज नाही आहे. सध्यातरी देशाचे प्राधान्य सर्वांना लस मिळण्याकडे असले पाहिजे. आतापर्यंत ज्यांना लस मिळालेली नाही, अशा लोकांचे लसीकरण करण्यावर आपण लक्ष दिले पाहिजे. त्यातही हाय रिस्क गटातील लोकांच्या लसीकरणावर विशेष लक्ष दिले गेले पाहिजे. अनेक आरोग्य कर्मचारी, वरिष्ठ नागरिक तसेच आधीपासून आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी लस घेतलेली नाही. हे असे लोक आहेत ज्यांना कोरोनाचा अधिक धोका आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.

तत्पूर्वी गुलेरिया यांनी लसीच्या बुस्टर डोसबाबत सांगितले होते की, भारताजवळ लसीचा तिसरा डोस देण्यासाठीच्या आवश्यकतेबाबत पुरेशी माहिती नाही आहे. पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यापर्यंत या संदर्भातील संपूर्ण डेटा मिळू शकतो. अनेक देशांमध्ये कोरोनाची लस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी बुस्टर डोस दिला जात आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिेकेमध्येही हाय रिस्क ग्रुपमधील लोकांना बुस्टर डोस देण्याची घोषणा झाली होती.

दरम्यान, गुलेरिया यांनी अँटिव्हायरल किंवा औषधांसाठी रिसर्चमधील गुंतवणूक वाढवण्याचा सल्ला दिला आहे. याचा उपयोग कोविड-१९च्या उपचारांमध्ये केला जाऊ शकतो. याबाबत त्यांनी सांगितले की, आम्ही अजूनही कोविड-१९ विरोधात कुठल्याही विशिष्ट्य अँटीव्हायरल ऐवजी अनेक अन्य औषधांचा वापर करत आहोत. तसेच दुर्दैवाने बहुतांश गुंतवणूक ही लस विकसित करण्यामध्ये खर्च झाली आहे. मात्र आम्ही प्रत्यक्षात अँटीव्हायरलच्या एका औषधासाठीच्या संशोधनामध्ये एवढी गुंतवणूक केली नाही. जे या विषाणूविरोधात प्रभावी ठरले असते.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य