Corona Vaccination: आता कोरोना लसीसाठी ६ नाही, ९ महिने थांबावं लागणार?; 'त्या' व्यक्तींसाठी मोठा निर्णय होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 12:33 PM2021-05-18T12:33:44+5:302021-05-18T12:37:52+5:30

Corona Vaccination: कोरोना लसीकरणाच्या धोरणात लवकरच बदल होण्याची शक्यता; काही दिवसांत मोठा निर्णय अपेक्षित

Corona Vaccination corona vaccine 9 months wait after recovery recommends ntagi | Corona Vaccination: आता कोरोना लसीसाठी ६ नाही, ९ महिने थांबावं लागणार?; 'त्या' व्यक्तींसाठी मोठा निर्णय होण्याची शक्यता

Corona Vaccination: आता कोरोना लसीसाठी ६ नाही, ९ महिने थांबावं लागणार?; 'त्या' व्यक्तींसाठी मोठा निर्णय होण्याची शक्यता

Next

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा काही दिवसांपासून कमी होत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला दररोज कोरोनाचे ४ लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. मात्र आता हा आकडा ३ लाखांच्या खाली आला आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवला जात आहे. कोरोना लसीकरणाच्या धोरणातही सातत्यानं बदल होत आहेत. कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आलाय आता यानंतर आणखी एक मोठा निर्णय अपेक्षित आहे.

कोरोनाचा कहर: ३.५ कोटी श्रमिकांनी वर्षभरात PF खात्यातून काढले १.२५ लाख कोटी रूपये

एखाद्या व्यक्तीनं कोरोनावर मात केल्यानंतर त्याच्या शरीरात अँटिबॉडी तयार होतात. या अँटिबॉडी पुढील काही महिने त्याचं कोरोनापासून रक्षण करतात. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना ९ महिन्यांनंतर लसीचा डोस देण्याचा निर्णय लवकरच होऊ शकतो. नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन ऍडमिनिस्ट्रेशनकडून (NEGVAC) याबद्दलचा निर्णय घेण्याचा शक्यता आहे. कोरोनामुक्त झालेल्यांना ९ महिन्यांनंतर लस देण्यात यावी अशी शिफारस या गटानं केली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांना ६ महिन्यांनंतर लस देण्याचा निर्णय नुकताच घेतला गेला होता. आता त्यात बदल होण्याची शक्यता आहे.

लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला २ कोटींचा टप्पा; कोरोना प्रतिबंध लसीकरणात देशात अग्रेसर

कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी पुन्हा लागण होण्याचा दर ४.५ टक्के इतका होता. यासाठीचं अंतर १०२ दिवस इतकं होतं. मात्र काही देशांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एकदा कोरोनावर मात केल्यानंतर निर्माण होणारी रोगप्रतिकारशक्ती ६ महिने टिकते, अशी माहिती नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन ऍडमिनिस्ट्रेशनं दिली. कोरोनावर मात केलेल्यांना सध्या लसीसाठी ६ महिने वाट पाहावी लागत आहे. मात्र आता हा कालावधी ९ महिन्यांपर्यंत वाढवला जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Corona Vaccination corona vaccine 9 months wait after recovery recommends ntagi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.