Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोरोनाचा कहर: ३.५ कोटी श्रमिकांनी वर्षभरात PF खात्यातून काढले १.२५ लाख कोटी रूपये

कोरोनाचा कहर: ३.५ कोटी श्रमिकांनी वर्षभरात PF खात्यातून काढले १.२५ लाख कोटी रूपये

Coronavirus PF Account : यापूर्वीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत प्रमाण अधिक. ही आकडेवारी चिंताजनक असल्याचं तज्ज्ञांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 11:56 AM2021-05-18T11:56:51+5:302021-05-18T11:59:24+5:30

Coronavirus PF Account : यापूर्वीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत प्रमाण अधिक. ही आकडेवारी चिंताजनक असल्याचं तज्ज्ञांचं मत

COVID 19 impact 35 million workers withdraw retirement savings worth Rs 1 25 lakh crore from PF accounts | कोरोनाचा कहर: ३.५ कोटी श्रमिकांनी वर्षभरात PF खात्यातून काढले १.२५ लाख कोटी रूपये

कोरोनाचा कहर: ३.५ कोटी श्रमिकांनी वर्षभरात PF खात्यातून काढले १.२५ लाख कोटी रूपये

Highlightsयापूर्वीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत प्रमाण अधिक.ही आकडेवारी चिंताजनक असल्याचं तज्ज्ञांचं मत

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम अर्थव्यवस्थेसोबतच लोकांच्या कमाईवरही झाला आहे. यामुळेच मोठ्या प्रमाणात लोकांनी आपल्या पीएफ खात्यातून पैसे काढले आहेत. मार्च महिन्याच्या अखेरपासून देशात कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत होती. त्यानंत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशातील काही भागांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला होता. याचाच परिणाम कामगार वर्षावर झाला आणि काही लोकांना नोकऱ्याही गमवाव्या लागल्या. तर काही जणांच्या वेतनात कपातही झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ एप्रिल २०२० पासून आतापर्यंत ३.५ कोटी लोकांनी आपल्या पीएफ खात्यातून मोठ्या प्रमाणात रक्कम काढल्याचं समोर आलं आहे. 

इकॉनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानुसार १ एप्रिलनंतर ३.५ कोटी लोकांनी १.२५ लाख कोटी रुपये काढले आहेत. जे २०१९-२०१० या आर्थिक वर्षाच्या तुलनेत अधिक आहेत. तेव्हा ईपीएफने ८१,२०० कोटी रूपयांचं सेटलमेंट केलं होतं. रिपोर्टनुसार १ एप्रिल २०२० ते १२ मे २०२१ या कालावधीत ३.५ कोटी श्रमिकांपैकी ७२ लाख श्रमिकांनी १८,५०० कोटी रूपयांच्या नॉन रिफंडेबल कोविड १९ फंडचा फायदा घेतला. सध्या देशात ६ कोटी ईपीएफओचे ग्राहक आहेत. 

मार्च २०२० मध्ये केंद्र सरकारनं ईपीएफओ ग्राहकांना ७५ टक्के पीएफ बॅलन्स किंवा तीन महिन्यांचं वेतन (जे कमी असेल ते) काढण्याची परवानगी दिली होती. रिपोर्टनुसार पीएफमधील रक्कम काढण्यात १० टक्क्यांची तेजी दिसून आली. रिटारमेंट, नोकरीतील बदल आणि आता कोरोनाची महासाथ ही कारण यात दिसून आली.  ही आकडेवारी अतिशय चिंताजनक असल्याचं मत प्राध्यापक के.आर.शाम सुंदर यांनी इकॉनॉमिक टाईम्सशी बोलताना सांगितलं. 

Web Title: COVID 19 impact 35 million workers withdraw retirement savings worth Rs 1 25 lakh crore from PF accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.