Corona Vaccination: मोठी बातमी! झायडसच्या 'विराफिन' औषधास परवानगी; कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ठरणार उपयोगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 16:13 IST2021-04-23T15:58:08+5:302021-04-23T16:13:47+5:30
Corona Vaccination: झायडस कॅडिलाच्या औषधाला डीजीसीआयची परवानगी

Corona Vaccination: मोठी बातमी! झायडसच्या 'विराफिन' औषधास परवानगी; कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ठरणार उपयोगी
नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून अतिशय झपाट्यानं वाढत आहे. काल देशात पहिल्यांदा ३ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये आता कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. याशिवाय कोरोना लसीकरणाला गती देण्याचं कामदेखील सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता झायडस कॅडिलानं तयार केलेल्या कोरोनावरील औषधाच्या वापरास ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (डीजीसीआय) परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच झायडस कॅडिला कंपनीच्या विराफिन औषधाचा वापर सुरू होईल. सध्याच्या घडीला देशात कोवॅक्सिन, कोविशील्ड लसींचा वापर सुरू आहे. तर पुढील काही दिवसांत स्पुटनिकची लसदेखील भारतात उपलब्ध होणार आहे. त्यानंतर आता विराफिनच्या वापरासदेखील परवानगी मिळाली आहे.
Drugs Controller General of India (DGCI) approves emergency use for Zydus Cadila's Pegylated Interferon alpha-2b, ‘Virafin’ for treating moderate #COVID19 infection in adults. pic.twitter.com/bXBvHZaIBp
— ANI (@ANI) April 23, 2021