Corona Lockdown कोरोनाचे वेगळेच, लॉकडाऊनने घेतले शेकडो बळी; 91 जणांनी तर आत्महत्याच केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 15:15 IST2020-05-15T15:15:21+5:302020-05-15T15:15:46+5:30
देशभरातील लॉकडाऊनमुळे मृत्यूंचा आकडा तीन संशोधक कनिका शर्मा, अमन आणि थेजेश यांनी तय़ार केला आहे.

Corona Lockdown कोरोनाचे वेगळेच, लॉकडाऊनने घेतले शेकडो बळी; 91 जणांनी तर आत्महत्याच केली
नवी दिल्ली : कोरोनामुळे देशात मृत्यूंचा आकडा 2600 पार गेला आहे. तर जगात तीन लाखांचा आकडा पार झाला आहे. कोरोना व्हायरस हा केवळ ६० नॅनोमीटर एवढ्याच आकाराचा आहे. तरीही त्याने जगाला बेजार करून सोडले आहे. भारतात केवळ २६४९ लोकांनीच कोरोनामुळे जीव गमावलेला नाहीय, तर ४१८ जण असे आहेत ज्यांना लॉकडाऊनमुळे प्राण गमवावे लागले आहेत. हा आकडा ११ मे पर्यंतचा आहे.
देशभरातील लॉकडाऊनमुळे मृत्यूंचा आकडा तीन संशोधक कनिका शर्मा, अमन आणि थेजेश यांनी तय़ार केला आहे. उत्तर प्रदेशचा एका तरुण रोजगारासाठी जयपूरला गेला होता. लॉकडाऊनमुळे तो तिथेच अडकला. वीट भट्टीवर काम करून गावी पैसे पाठवत होता. काम बंद झाले. त्याने गावी फोन करून सांगितले की मी येतोय. पण तो आलाच नाही. नंतर समजले त्याने राहत्या खोलीतच आत्महत्या केली. पुण्यातील इंजिनिअरनेही अशीच भीतीने आत्महत्या केली आहे.
गुरुवारी पुण्यातही एका कोरोना संशयित पेशंटने हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. अशा घटनांमध्ये भर म्हणून गेल्या आठवड्यात औरंगाबादमध्ये १६ स्थलांतरीत मजुरांचा मालगाडीखाली आल्याने मृत्यू झाला होता. असेच काही स्थलांतरीत गावी पायी जात असताना वाहनांनी उडविल्याचे प्रकार समोर आले आहेत. तर काहींनी घर काही किमीवर असताना शेकडो किमी पायपीट केल्याने प्राण सोडल्याच्याही घटना घडल्या आहेत.
लॉकडाऊनमुळे राज्यांनी सध्या दारुची दुकाने सुरु केली आहेत. मात्र, पहिले दीड दोन महिने दारु मिळाली नसल्यानेही काहींनी सॅनिटायझर किंवा अन्य काही पिल्याने मृत्यू झाले आहेत. असे जवळपास ४६ जण आहेत.
अशाप्रकारे मृत्यू झालेल्यांमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. ७३ आणि ५० अशी आकडेवारी आहे. उत्तर प्रदेशात मृत झालेले जादातर मजूर होते. लॉकडाऊनमुळे पैसे संपल्याने तणावातून त्यांनी जीवन संपवले.
महत्वाच्या बातम्या...
बाबो! हायवेला जागा गेली; 400 कोटींची भरपाई पाहून एकाच नावाचे १३ दावेदार प्रकटले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'आमदार' झाले; ९ जणांचे विधान परिषद सदस्यत्व जाहीर
अवघा देश भिकेला लावला; आता पाकिस्तानी सैन्याला दणक्यात पगारवाढ हवीय