CoronaVirus : लसीचे दोन डोस घेऊनही २५ वर्षीय पोलिसाचा कोरोनाने घेतला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 21:07 IST2021-04-22T21:05:11+5:302021-04-22T21:07:18+5:30
CoronaVirus : वैद्यकीय तपास अहवालात तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.

CoronaVirus : लसीचे दोन डोस घेऊनही २५ वर्षीय पोलिसाचा कोरोनाने घेतला जीव
सीकर - राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात कोरोनाने संक्रमित रुग्णांच्या मृत्यूची संख्याही सतत वाढत आहे. गुरुवारी कोरोनाने तारपुरा येथील डाबर जोडी येथे राहणाऱ्या २५ वर्षीय कॉन्स्टेबल बनवारी लाल भींचरचा जीव घेतला आहे. जो पोलिस लाइनमध्ये तैनात होता. महत्वाचे म्हणजे फ्रंट लाइन वर्कर म्हणून मृत पोलिसाने कोरोना लसीचे दोन्ही डोसही घेतले होते. मात्र, बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांची अचानक प्रकृती खालावली. पोलीस सहकाऱ्याने त्या पोलिसाला तात्काळ एसके रुग्णालयात दाखल झाले. जेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय तपास अहवालात तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.
गुरुवारी कॉन्स्टेबल बनवारी लाल यांचे पार्थिव तारापुरा गावात झाले. जेथे पीपीई किट परिधान केलेल्या निवडक लोकांच्या उपस्थितीत मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यापूर्वी सकाळी मृताचा मृतदेह एसके हॉस्पिटलमधून गावात नेण्यात आला.
दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह, मूत्रपिंडाचा आजार होता
मिळालेल्या माहितीनुसार, मृत हवालदार देखील किडनीच्या आजाराने पीडित होता. ज्याला वेळोवेळी डायलिसिस करायचा. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याला कोरोनाची लागणही झाली होती. मात्र, उपचारानंतर तो बरा झाला. यानंतर, त्याला नेचवा पोलिस ठाण्यात तैनात केले. काही दिवसांपूर्वी त्यांची पोस्टिंग पोलिस लाईनवरकरण्यात आली होती.
तीन वर्षांपूर्वी लग्न झाले
मृत बनवारी लाल 2013 मध्ये पोलिसात दाखल दाखल झाला होता. चार वर्षांनंतर, 2017 मध्ये तिचे लग्न झाले होते. तो एका दोन वर्षाच्या मुलाचा बाप देखील होता. हवालदाराच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
कोरोनाचा आलेख सतत वाढत आहे
विशेष म्हणजे, सीकरमधील कोरोना संसर्ग रुग्णांचा आलेखही सतत वाढत आहे. बुधवारी जिल्ह्यात कोरोनाचे 380 नवीन रुग्ण आढळले. जे एका दिवसात आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे.