शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

China Coronavirus : आता 'कोरोना'लाही विम्याचं कवच? कंपन्यांकडून तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 11:41 AM

China Coronavirus : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (इरडा) विमा कंपन्यांना एक नवीन पॉलिसी तयार करण्याचे आदेश दिले आहेत

ठळक मुद्देभारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (इरडा) विमा कंपन्यांना एक नवीन पॉलिसी तयार करण्याचे आदेश दिले. कोरोना व्हायरससाठी ही नवीन पॉलिसी तयार करण्याचे आदेश.पॉलिसीमध्ये कोरोना व्हायरसच्या उपचाराच्या खर्चाचा देखील समावेश असेल.

नवी दिल्ली - चीनमध्ये कोरोना व्हायरसने (कोविड-19) थैमान घातले आहे. चीनशिवाय अन्य देशांतही कोरोनाची साथ पसरली आहे. कोरोना संसर्गामुळे बळी गेलेल्यांची संख्या 3,286 वर पोहोचली आहे तसेच 95,484 पेक्षा जास्त लोकांना आतापर्यंत लागण झाली आहे. पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या 16 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. इटलीमध्ये अनेकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (इरडा) विमा कंपन्यांना एक नवीन पॉलिसी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना व्हायरससाठी ही नवीन पॉलिसी तयार करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जगभरात हजारो लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळेच या नवीन पॉलिसीमध्ये कोरोना व्हायरसच्या उपचाराच्या खर्चाचा देखील समावेश असेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 29 झाली असून, परदेशात राहणाऱ्या 18 भारतीयांना लागण झाली आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये, म्हणून केंद्र सरकारने जाहीर कार्यक्रम न घेण्याचा सल्ला दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विटर अकाऊंटवर ट्विट केलं आहे. जगभरातील तज्ज्ञ सांगत आहेत की, कोरोना व्हायरस (COVID-19) टाळण्यासाठी कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करू नये, मोठ्या संख्येने लोक एकत्रित केले जाऊ नयेत. यासाठी यावर्षी कोणत्याही होळीच्या कार्यक्रमात सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे ट्विट नरेंद्र मोदींनी केले आहे. परदेशात व भारतात लोक एकमेकांना भेटल्यावर हस्तांदोलन करतात. पण परदेशात लोक हस्तांदोलन टाळत आहेत. पण आता भारतीय संस्कृतीतील नमस्काराची पद्धत तिथे रूढ होत आहे. अनेक देशांतील लोकांनी मांसाहार बंद केला असून, ते शाकाहाराकडे वळत आहेत.  

कोरोना व्हायरसचं संकट टाळण्यासाठी जगातील सर्व देशांनी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लोक कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अडकल्याची माहिती आहे. 3 हजारांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. फेसबुक, ट्विटर आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची सूचना केली आहे. कर्नाटक सरकारने कर्मचार्‍यांना घरून काम करण्याचा सल्ला दिला आहे. कर्नाटक सरकारने बेंगळूरमधील सर्व कंपन्यांना सूचना केली आहे. जर कोणत्याही कर्मचाऱ्यामध्ये आजाराची लक्षणे आढळली तर त्याला घरातूनच काम करण्याचा सल्ला दिला आहे. देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, तसेच लोकांना स्वच्छता ठेवण्यास सांगितले जात आहे कर्नाटक सरकारने यासाठी परिपत्रक जारी केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

Big Breaking : भारतीय महिला संघाची ICC Women's T20 World Cupच्या अंतिम फेरीत धडक

Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर पाच वर्षांत 446 कोटींचा खर्च

China Coronavirus : 'राहुल गांधींनी कोरोना चाचणी केली का?', भाजपा खासदाराचा सवाल

भाजप सरकारच्या काळात २000 कोटींची अनियमितता, कॅगचा ठपका

कोरोना विषाणू आता नोटिफाइड, आरोग्य विभागाची माहिती

 

टॅग्स :corona virusकोरोनाIndiaभारत