धक्कादायक! भारतातील सांडपाण्यातही सापडले कोरोनाचे नमुने; सेंटर फॉर मॉलिक्यूलर बायोलॉजीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 05:33 PM2020-08-22T17:33:21+5:302020-08-22T17:46:25+5:30

सांडपाण्यातूनही कोरोना व्हायरस होऊ शकतो.

Corona found in sewage in India; Claimed by the Center for Molecular Biology | धक्कादायक! भारतातील सांडपाण्यातही सापडले कोरोनाचे नमुने; सेंटर फॉर मॉलिक्यूलर बायोलॉजीचा दावा

धक्कादायक! भारतातील सांडपाण्यातही सापडले कोरोनाचे नमुने; सेंटर फॉर मॉलिक्यूलर बायोलॉजीचा दावा

Next

नवी दिल्ली:  देशातील कोरोनामुक्तीचा दर सातत्याने वाढत आहे. जवळपास ७५ टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली असून भारतात सध्य:स्थितीत २३.८ टक्के कोरोनारुग्ण आहेत. मात्र याचदरम्यान सांडपाण्यात कोरोनाचा व्हायरसचे नमुने आढळल्याची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये सांडपाण्यात कोरोनाचा व्हायरसचे नमुने आढळले आहेत. हैदराबाद इथल्या 'सेंटर फॉर मॉलिक्यूलर बायोलॉजी'नं (CCMB) हा दावा केला आहे. व्हायरसचे सापडलेले नमुने संसर्गजन्य नसल्याचंही सेंटर फॉर मॉलिक्यूलर बायोलॉजीनं म्हटलं आहे.

सांडपाण्यातूनही कोरोना व्हायरस होऊ शकतो. आम्ही यासाठीच प्रयत्न करत आहोत. आम्हाला सांडपाण्यात कोरोनाचे नमुने सापडले आहेत आणि त्यांचं प्रमाण किती आहे, हेसुद्धा शोधण्यात आम्हाला यश मिळालं आहे, असं सेंटर फॉर मॉलिक्यूलर बायोलॉजीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच लोकांकडे जाण्यापेक्षा तुम्ही सांडपाणी एकत्र करून त्याची चाचणी करू शकता. यातील व्हायरसचं प्रमाण पाहून संबंधित भागात व्हायरसचा संसर्ग किती झाला आहे याची माहिती तुम्हाला मिळू शकते, अशी माहिती देखील त्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, देशात शुक्रवारी ६८ हजार ८९८ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली. ९८३ रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे गुरुवारी उच्चांकी ६२ हजार २८२ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे अहवाल प्राप्त झालेत. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २९ लाख ५ हजार ८२३ एवढी झाली असली, तरी यातील २१ लाख ५८ हजार ९४६ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. ६ लाख ९२ हजार २८ रुग्णांवर (२३.८%) विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. देशात आतापर्यंत ५४ हजार ८४९ रुग्णांचा (१.९०%) कोरोनाने बळी घेतला आहे. सर्वाधिक कोरोनाप्रभावित महाराष्ट्रात गेल्या एका दिवसात उच्चांकी १४ हजार ६४७ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या-

" मी, माझं आणि मलाच; आई 'बबड्या'साठी एवढं तर करणारच"

Video: गणरायाच्या डेकोरेशनमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर प्रवीण तरडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Web Title: Corona found in sewage in India; Claimed by the Center for Molecular Biology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.