Corona Bed Scam: तेजस्वी सूर्या यांनी मोठा घोटाळा उघड केला; भाजपशासित महापालिका हॉस्पिटलमध्ये बेडसाठी लाचखोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 09:11 AM2021-05-05T09:11:03+5:302021-05-05T09:38:49+5:30

Corona Bed Scam: बंगळुरु नगरपालिकेचे अधिकारी पैसे घेऊन लोकांना बेड उपलब्ध करत आहेत. सूर्या यांच्या आरोपानंतर पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

Corona Bed Scam: Tejaswi Surya exposed the big scam; Beds are obtained in BJP-ruled municipal hospitals by taking bribe | Corona Bed Scam: तेजस्वी सूर्या यांनी मोठा घोटाळा उघड केला; भाजपशासित महापालिका हॉस्पिटलमध्ये बेडसाठी लाचखोरी

Corona Bed Scam: तेजस्वी सूर्या यांनी मोठा घोटाळा उघड केला; भाजपशासित महापालिका हॉस्पिटलमध्ये बेडसाठी लाचखोरी

Next

बंगळुरुच्या दक्षिणमधून खासदार झालेले तेजस्वी सूर्या (Tejaswi Surya) यांनी कोरोना काळात भाजपाचीच (BJP ) सत्ता असलेल्या महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये लाच घेऊन कोरोना रुग्णांना बेड दिले जात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसल्याबद्दल त्यांनी महानगर पालिकेलाच जबाबदार धरले आहे. (BBMP Officials taking bribe for allocate beds corona Patient. Scam Exposed by BJP MP Tejaswi Surya.)


नगरपालिकांचे अधिकारी पैसे घेऊन लोकांना बेड उपलब्ध करत आहेत. सूर्या यांच्या आरोपानंतर पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. रोहित आणि नेत्र अशी यांची नावे आहेत. हे दोघे एका बेडसाठी 25 ते 50 हजारांची लाच घेत होते. पोलिसांनी त्यांच्या खात्यातून 1.05 लाख रुपये जप्त केले आहेत. 


सूर्यांनी आरोप केला आहे की, बीबीएमपी अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बेड देण्यात गैरव्यवहार सुरु आहेत. बीबीएमपी साईटवर सर्व बेड फुल असल्याचे दाखवत आहे. मात्र, अनेकजण हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होत आहेत. अशामुळे बेड कसे फुल असतील हे समजण्यापलिकडे आहे, असे ते म्हणाले. बीबीएमपी अधिकारी, आरोग्य मित्र आणि बाहेरचे लोक यामध्ये गुंतलेले आहेत. जे रुग्ण कोरोना बाधित आहेत परंतू होम आयसोलेट आहेत त्यांच्या नावे हे बेड आरक्षित केले जात होते. या रुग्णांना याची कल्पनाही नव्हती. असे एकच नाही तर हजारो रुग्णांच्या नावे बेड आरक्षण घोटाळा करण्य़ात आला आहे, असा आरोप सूर्या यांनी केला आहे. 


कोरोना प्रभावित राज्यांमध्ये कर्नाटकचा देखील समावेश आहे. बंगळुरुमध्ये कोरोना स्थिती गंभीर बनत चालली आहे. शहरातील हॉस्पिटलमध्ये बेड आणि ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. सूर्या यांच्या आरोपांनंतर येडीयुराप्पा सरकारने नगरपालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. 

Web Title: Corona Bed Scam: Tejaswi Surya exposed the big scam; Beds are obtained in BJP-ruled municipal hospitals by taking bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.