शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
2
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
3
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
4
भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची 'लुडबुड'; स्वतःच्या देशात सुरक्षेचा पत्ता नाही आणि म्हणतंय...
5
भारतावर विश्वास ठेवा, इतरांच्या दाव्यांकडे दुर्लक्ष करा; भारत-अमेरिका करारावर गोयल यांची स्पष्टोक्ती
6
"मी यांना चॅलेंज देतो की, या ठाकरे बंधूंनी..."; भाजपच्या गिरीश महाजन यांचा आक्रमक पवित्रा
7
IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडकडून सलामी जोडीनंतर डॅरिल मिचेलची बॅट तळपली! टीम इंडियासमोर ३०१ धावांचं आव्हान
8
₹३६३४१२००००००० स्वाहा...! देशातील 7 कंपन्यांना मोठा फटका, रिलायन्सचं सर्वाधिक नुकसान 
9
‘आमच्यावर बॉम्ब फेकले तर अमेरिकेचे..., तणाव वाढत असताना इराणची थेट धमकी   
10
“हिंदू समाजाने एकत्र राहणे गरजेचे, २० वर्षांत भारत देश विश्वगुरू बनून जगाला...”: मोहन भागवत
11
भाजपा बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष, बेटी बचाव बेटी पढाव नाही तर…’, काँग्रेसची बोचरी टीका
12
PM Modi: भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
13
इलेक्ट्रिक वाहनांची 'सुसाट' धाव! २०२५ मध्ये २३ लाख ई-वाहनांची नोंदणी; कोणतं राज्य अव्वल?
14
IND vs NZ : डॉक्टर तरुणीची रोहितसाठी हटके फलकबाजी; मैत्रिणीने वामिकाचा उल्लेख करत विराटकडे केली 'ही' मागणी
15
१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…
16
इराणमध्ये मोठी कारवाई करण्याच्या तयारीत अमेरिका? ट्रम्प यांच्या धमकीनंतर, इस्रायल 'हाय अलर्ट'वर
17
‘जैशकडे हजारो आत्मघाती हल्लेखोर…’, नव्या ऑडियोमधून मसूद अझहरची धमकी
18
कुत्र्याची भन्नाट हुशारी! तगड्या पिटबूलची 'अशी' केली फजिती; Video पाहून नेटकरीही थक्क
19
ट्रम्प यांच्या अमेरिकेत एक नवीन दहशत, गुलाबी कोकेन; सेवन केल्यावर शरीर निळे पडते
20
फॉर्म भरण्याचा त्रास संपला! UPI द्वारे PF काढता येणार; अवघ्या काही सेकंदात पैसे बँक खात्यात जमा
Daily Top 2Weekly Top 5

Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 10:47 IST

या कायद्यानुसार, 'घरवापसी'ला धर्मांतरण मानण्यात येणार नाही. अर्थात, मूळ धर्मात परत येणे गुन्हा ठरणार नाही. सत्ताधारी भाजपने या निर्णयाचे स्वागत केले असून, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचे आभार मानले आहेत.

राजस्थानात आत धर्मांतरण विरोधी कायदा लागू झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यासंदर्भात राजकीय वाद आणि चर्चा सुरू होती. मात्र अखेर आता यासंदर्भातील विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले आहे. राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी "राजस्थान विधि विरुद्ध धर्म समपरिवर्तन अधिनियम, २०२५" ला मंजुरी दिली असून, आता हा कायदा राज्यात लागू झाला आहे. महत्वाचे म्हणजे, जबरदस्ती, आमिष दाखवून अथवा फसवणुकीने होणारे धर्मांतर रोखण्याच्या उद्देशाने आणलेल्या या कायद्यातील तरतुदी अतिशय कठोर आहेत.

या धर्मांतरण विरोधी कायद्यानुसार, आता दोषी आढळल्यास आजीवन कारावास आणि ५० लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. यासंदर्भातील सर्व गुन्हे अजामीनपात्र असतील. त्यांची सुनावणी सत्र न्यायालयात होईल. महत्वाचे म्हणजे, या कायद्यातील सर्वात कठोर तरतूद म्हणजे, सामूहिक धर्मांतरण. या कायद्यानुसार, ज्या ठिकाणी सामूहिक धर्मांतरणाचा गुन्हा घडला असेल, ती इमारत अथवा ते ठिकाण बुलडोझरने पाडण्याची तरतूद आहे. अशा प्रकारची तरतूद देशातील अन्य कोणत्याही धर्मांतरण कायद्यात नाही. यामुळे राजस्थानचा कायदा सर्वात कठोर मानला जात आहे. 

'घरवापसी'ला धर्मांतरण माणण्यात येणार नाही -याशिवाय, या कायद्यानुसार, 'घरवापसी'ला धर्मांतरण मानण्यात येणार नाही. अर्थात, मूळ धर्मात परत येणे गुन्हा ठरणार नाही. सत्ताधारी भाजपने या निर्णयाचे स्वागत केले असून, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचे आभार मानले आहेत. जबरदस्तीच्या धर्मांतरांवर यामुळे लगाम बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

काँग्रेस आणि भारत आदिवासी पक्ष (BAP) आदींनी  विरोधी पक्षांनी या कायद्यावर जोरदार टीका केली आहे. हा कायदा संविधानातील धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. यामुळे समाजातील ध्रुवीकरण वाढवेल, असे त्यांनी म्हटले आहे. हा कायदा लागू होताच, अनेक सामाजिक संघटनांनी याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचीही तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, देशभरातील १२ राज्यांमध्ये आधीच धर्मांतरण कायदा लागू आहे. ती प्रकरणंही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rajasthan Enacts Strict Anti-Conversion Law; Stiff Penalties Imposed

Web Summary : Rajasthan's anti-conversion law imposes strict penalties, including life imprisonment and hefty fines. It targets forceful conversions, allows 'ghar wapsi,' and demolition of buildings used for mass conversions. Opposition criticizes it as violating religious freedom.
टॅग्स :Haribhau Bagadeहरिभाऊ बागडेBJPभाजपाRajasthanराजस्थानHinduहिंदू