पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 03:16 IST2025-05-13T03:14:46+5:302025-05-13T03:16:11+5:30

देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी १० उपग्रह २४ तास सतत देखरेख करत आहेत. भारतावर डागलेल्या चिनी क्षेपणास्त्राची ताकद किती?

conversation with wife of soldier in pakistan custody promise to try for release | पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा

पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पाकच्या ताब्यात असलेले बीएसएफचे कॉन्स्टेबल पूर्णम कुमार साहू यांच्या पत्नी रजनी व ममता बॅनर्जी यांची फोनवर चर्चा झाली. साहू यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन ममतांनी दिले आहे.

 सुरक्षेसाठी १० उपग्रहांची सतत देखरेख

देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी १० उपग्रह २४ तास सतत देखरेख करत आहेत, असे भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी सांगितले आहे.

भारतावर डागलेल्या चिनी क्षेपणास्त्राची ताकद किती?

भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानने केवळ तुर्की ड्रोनचा वापर केला नाही तर चीनचे पीएल-१५ क्षेपणास्त्रही डागले.  मात्र  भारतीय लष्कराने पीएल-१५ क्षेपणास्त्र पाडले आहे आणि त्याचे अवशेषदेखील सापडले आहेत. थंडरबोल्ट-१५ म्हणूनही ओळखले जाणारे पीएल-१५ हे डीआरडीओने विकसित केलेल्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या बरोबरीचे मानले जाते. 

पीएल-१५ क्षेपणास्त्राची खास वैशिष्ट्ये काय?

पीएल-१५ हे चीनने विकसित केलेले हवेतून हवेत मारा करणारे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. पीएल-१५ ची कमाल श्रेणी २०० किलोमीटर आहे. ते चीनच्या सीएएमएने विकसित केले आहे. त्याची निर्यात आवृत्ती २०२१ च्या झुहाई एअर शोमध्ये प्रदर्शित करण्यात आली. निर्यात आवृत्तीची रेंज १४५ किमी आहे. यात दुहेरी घन इंधन रॉकेट मोटर वापरली जाते. हे क्षेपणास्त्र मॅक ५ पेक्षा जास्त वेगाने मारा करू शकते, ते ध्वनीच्या वेगापेक्षा ५ पट जास्त आहे. या क्षेपणास्त्राची लांबी ४ मीटर आहे आणि त्याचा व्यास २०० मिलिमीटर आहे.

 

Web Title: conversation with wife of soldier in pakistan custody promise to try for release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.