शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

कॉन्व्हेन्ट शाळांमध्ये फादरनां प्राचार्य बोलण्याची सक्ती

By admin | Updated: November 24, 2014 18:53 IST

छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील कॉन्व्हेंट शाळांमध्ये फादरचा उल्लेख प्रचार्य, गुरुजी किंवा सर असा करण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमत
रायपूर (छत्तीसगड), दि. २४ - छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील कॉन्व्हेंट शाळांमध्ये फादरचा उल्लेख प्रचार्य, गुरुजी किंवा सर असा करण्यात येणार आहे. विश्व हिंदू परिषदेच्य दबावाला बळी पडत येथील कॉन्व्हेंट शाळा चालकांनी हा प्रस्ताव मान्य केला आहे.  या संदर्भात दोन्ही संस्थांच्या प्रमुखांची रविवारी (दि. २३)  बैठक झाली असून या बैठकीत कॅथलिक शाळा चालकांनी विश्व हिंदू परिषदेच्या अटी मान्य केल्या आहेत.
 या प्रस्तावावर विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष सुरेश यादव आणि बस्तर कॅथलिक कम्युनिटीचे प्रवक्ते अब्राहम कन्नामपला यांनी स्वक्ष-या केल्या आहेत. बस्तर हा आदिवासी बहूल विभाग असून या विभागात कॅथलिक समाजातर्फे २२ शाळा चालवल्या जातात. या विभागात केरळहून अधिक मिशनरींचा विकास झाला आहे.  दोन्ही संस्थांच्या मान्यतेनुसार सर्व कॉन्व्हेंट शाळांतील सुचनाफलकांवर 'फादर' चा उल्लेख प्रचार्य, उपप्राचार्य किंवा सर असा करण्यात यावा अशी सुचना लिहली आहे. तसेच कॅथलिक पंथाकडून कोणत्याही समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास आम्ही दिलगिरी व्यक्त करतो असेही लिहण्यात आले आहे. याबाबात अधिक स्पष्टिकरण देताना सुरेश यादव यांनी असे सांगितले की, फादर या शब्दाचा अर्थ पिता असा होतो, हिंदू धर्मात पिता एकच असतो त्यामुळे आम्ही शिक्षकांना पित्याचा दर्जा कसा देणार? यावर युक्तिवाद करत मिशन-यांनी बायबलमध्ये फादरचा अर्थ गॉडफादर असा होतो असे सांगितले असता सुरेश यादव यांनी शाळांमध्ये बायबलचे धडे का देण्यात यावेत तसेच इतर शाळांमध्ये शिक्षकांना फादर बोलण्याचा नियम नसताना हा नियम कॉन्व्हेंट शाळांमध्येच असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सरस्वतीच्या प्रतिमेबद्दल सांगताना त्यांनी असे सांगितले की, कोणत्याही वयस्कर स्त्रीला आम्ही मातेचा दर्जा देतो. तिला आई किंवा ताई असे आदराने म्हणतो. या प्रकरणी कॅथलिक पंथाच्या प्रवक्ते कानमपला यांनी असे सांगितलेकी, आम्ही कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच फादर संबोधण्यासाठी आमचा कुणावरीह दबाव नाही, आम्ही सरस्वती देवीची प्रतिमा आमच्या शाळांमध्ये लावण्यास तयार आहोत असेही त्यांनी सांगितले.