शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

एंजल टॅक्सप्रकरणी स्टार्टअप कंपन्यांना सरकार आणखी सूट देण्याच्या विचारात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 5:45 AM

कर वसुलीसाठी नोटिसा मिळाल्यामुळे ओरड करणाऱ्या स्टार्टअप कंपन्यांना आणखी काही सवलती देण्याचा विचार केंद्र सरकारने चालविला आहे.

बंगळुरू - कर वसुलीसाठी नोटिसा मिळाल्यामुळे ओरड करणाऱ्या स्टार्टअप कंपन्यांना आणखी काही सवलती देण्याचा विचार केंद्र सरकारने चालविला आहे. केंद्रीय थेट कर बोर्ड (सीबीडीटी) आणि उद्योग व अंतर्गत व्यापार विभागाच्या (डीपीआयआयटी) वरिष्ठ अधिकाºयांनी स्टार्टअप कंपन्यांसोबतच्या बैठकीत ही माहिती दिली. सध्या करमाफीसाठी असलेली १0 कोटींची मर्यादा वाढवून २५ कोटी करण्यावर विचार केला जाईल, असे या बैठकीत सांगण्यात आले.डीपीआयआयटी विभागाचे सचिव रमेश अभिषेक यांच्यासह अनेक प्रमुख अधिकारी बैठकीला उपस्थित होते. अनेक उद्योजक आणि एंजल गुंतवणूकदारांचीही बैठकीला उपस्थिती होती. सध्या सातपैकी कोणत्याही सलग तीन आढावा वर्षांसाठी स्टार्टअप कंपन्यांना कर माफी दिली जाते. यातील सात वर्षांची मुदत दहा वर्षे करण्यावरही सरकार विचार करीत आहे, असे बैठकीत सांगण्यात आले.बैठकीतील निर्णयानुसार, स्टार्टअप कंपन्या एका आठवड्याच्या आत एक गाभा समिती स्थापन करतील. ही समिती आपले अंतिम निवेदन सरकारला सादर करील. त्यानंतर कर विभाग आणि डीपीआयआयटी अतिरिक्त सवलतीबाबत नवीन अधिसूचना काढील.कलम रद्द होणार नाहीसूत्रांनी सांगितले की, एंजल टॅक्सशी संबंधित कलम ५६ (२) (७) ब पूर्णत: रद्द करण्याची स्टार्टअप कंपन्यांची मागणी होती. तथापि, ही मागणी मान्य होणार नसल्याचे आजच्या बैठकीतून स्पष्ट झाले.

टॅग्स :TaxकरIndiaभारत