शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली निकालावरून काँग्रेसमध्ये वाक्युद्ध

By admin | Updated: February 13, 2015 01:12 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत लाजिरवाण्या पराभवाची कारणमीमांसा करताना काँग्रेसमध्ये आज गुरुवारी जाहीर वाक्युद्धाला सुरुवात झाली़ काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित

नबीन सिन्हा, नवी दिल्लीदिल्ली विधानसभा निवडणुकीत लाजिरवाण्या पराभवाची कारणमीमांसा करताना काँग्रेसमध्ये आज गुरुवारी जाहीर वाक्युद्धाला सुरुवात झाली़ काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांनी दिल्ली निवडणुकीत पक्षाचे चेहरे राहिलेले अजय माकन यांच्यावर तोंडसुख घेऊन, या वाक्युद्धाला तोंड फोडले़ ज्येष्ठ नेत्यांकडूनच पक्षाचे जाहीर वाभाडे काढले जात असल्याचे पाहून, अखेर काँग्रेस अध्यक्षा सोनिया यांना यात मध्यस्थी करावी लागली़ निवडणूक निकालांबाबत जाहीर चर्चा टाळा, अशी तंबीच त्यांनी दिली़ अजय माकन यांची मला कीव करावीशी वाटते, अशा शब्दांत शीला दीक्षित यांनी पराभवाचे संपूर्ण खापर त्यांच्या माथी फोडले़ पाठोपाठ काँग्रेस नेते पी़सी़ चाको, दिल्लीचे काँग्रेस अध्यक्ष अरविंदरसिंग लव्हली आदी माकन यांचा बचाव करताना मैदानात उतरले़ खुद्द माकन यांनी दीक्षितांच्या टीकेने दुखावल्याने पक्षाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली़ पक्षाचे असे जाहीर वाभाडे काढले जात असल्याचे पाहून, सोनिया गांधी यांना अखेर आपल्या ‘बोलघेवड्या’ नेत्यांना तंबी द्यावी लागली़ संध्याकाळी चाको आणि लव्हली सोनिया यांना भेटायला गेले असताना त्यांनी स्पष्ट शब्दांत पक्षनेत्यांना तंबी दिली़ सोनिया गांधींना भेटून बाहेर आल्यानंतर खुद्द चाको यांनी ही माहिती दिली़ ज्येष्ठ नेत्यांनी जाहीरपणे परस्परांवर दोषारोपण करणे दुर्दैवी असून त्यांनी संयम बाळगावा, जाहीर चर्वितचर्वण थांबवावे, असा संदेश माझ्या माध्यमातून सोनियांनी सर्व पक्षनेत्यांना दिला असल्याचे त्यांनी सांगितले़