काँग्रेसच्या सर्व्हेनेच राहुल गांधींचा दावा खोटा ठरवला! लोकांचा ईव्हीएमवर विश्वास
By संतोष कनमुसे | Updated: January 2, 2026 12:12 IST2026-01-02T11:47:59+5:302026-01-02T12:12:44+5:30
कर्नाटक काँग्रेसने ईव्हीएम मशिनबाबत राज्यात एक सर्व्हे केला आहे. यावरून आता भाजपाने काँग्रेवर टीका केली. काँग्रेस फक्त हरल्यावरच संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते आणि जिंकल्यावर त्याच व्यवस्थेचा आनंद साजरा करते. भाजपाने याला सोयीचे राजकारण म्हटले.

काँग्रेसच्या सर्व्हेनेच राहुल गांधींचा दावा खोटा ठरवला! लोकांचा ईव्हीएमवर विश्वास
काँग्रेस मागील काही दिवसांपासून ईव्हीएम मशिनबाबत वेगवेगळे दावे करत आहे. खासदार राहुल गांधींनीही यावरून निवडणूक आयोगावर आरोप केले आहे. ईव्हीएम मशिनबाबत कर्नाटक सरकारने एक अधिकृत सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये ईव्हीएमवरील प्रश्नाला नवीन वळण दिले आहे. सर्व्हेक्षणानुसार, कर्नाटकातील जनतेचा एक मोठा वर्ग ईव्हीएम सुरक्षित आणि अचूक मानतो. या निकालांनंतर, राहुल गांधी यांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवरून भाजपने काँग्रेसवर टीका केली.
कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) व्ही. अंबुकुमार यांच्यामार्फत हे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये १०२ विधानसभा मतदारसंघांमधील ५,१०० लोकांची मते घेण्यात आली.
विशेष लेखः भाजप - यश कळसाला, शिस्त तळाला! पक्षाची संस्कृती ढासळली तर...
या सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या एकूण ८३.६१% लोकांनी ईव्हीएम विश्वसनीय असल्याचे सांगितले. ईव्हीएम अचूक निकाल देतात यावर ६९.३९% लोकांनी सहमती दर्शवली, तर १४.२२% लोकांनी यावर 'पूर्ण सहमती' व्यक्त केली. लेक कलबुर्गीमध्ये ईव्हीएमवर सर्वाधिक विश्वास दिसून आला, तिथे ९४.४८% लोक मतदान यंत्राच्या बाजूने होते. म्हैसूरमध्ये ८८.५९% लोकांनी त्याच्या विश्वासार्हतेला मान्यता दिली. बेंगळुरूमध्ये ६३.६७% लोकांनीही यावर सहमती दर्शविली.
भाजपचा पलटवार
सर्वेक्षणाचे निकाल जाहीर होताच, भाजपने याला काँग्रेससाठी लाजिरवाणे म्हटले. कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर लिहिले की, "वर्षानुवर्षे राहुल गांधी देशभरात एकच गोष्ट पसरवत आहेत. भारताची लोकशाही धोक्यात आहे आणि ईव्हीएम अविश्वसनीय आहेत. पण कर्नाटकातील काँग्रेस सरकारने केलेल्या सर्वेक्षणातून वेगळीच गोष्ट समोर येते. ही काँग्रेसच्या तोंडावर चापट आहे, असा निशाणा त्यांनी लगावला.
"काँग्रेस फक्त हरल्यावरच संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते आणि जिंकल्यावर त्याच व्यवस्थेचा उत्सव साजरा करते, असंही ते म्हणाले. त्यांनी काँग्रेसचे हे सोयीचे राजकारण असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे, या दरम्यान हा सर्व्हे घेण्यात आला आहे. ईव्हीएमवरील जनतेचा विश्वास कमी होत चालला आहे, असा दावा त्यांनी केला होता. भाजपने यावर टीका केली. सरकारच्या स्वतःच्या सर्वेक्षणात जनतेचा प्रचंड विश्वास दिसून येत असताना सरकार राज्याला मागे का नेत आहे?, असा सवाल भाजपाने केला. भाजपच्या मते, मतपत्रिकेकडे परतणे हा निवडणुका हाताळण्याचा आणि विलंब करण्याचा प्रयत्न आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या काही काळापासून ईव्हीएमच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यानही त्यांनी "ब्लॅक बॉक्स" आणि "व्होट चोरी" सारखे शब्द वापरून निवडणूक आयोगाच्या कामकाजावर टीका केली. दरम्यान, आता त्यांच्याच राज्य सरकारने केलेल्या या सर्वेक्षणामुळे काँग्रेसच्या दाव्यावरच प्रश्न उपस्थित झाले आहेत.