शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
2
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
6
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
7
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
8
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
9
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

सुनंदांच्या गूढ मृत्यूप्रकरणी शशी थरूरांवर खटला चालणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2018 3:17 PM

काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या अडचणीत वाढ झालीय. दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर आत्महत्या प्रकरणात दिल्लीतल्या पटियाळा हाऊस कोर्टानं शशी थरूर यांना आरोपी ठरवलं आहे.

नवी दिल्ली- काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या अडचणीत वाढ झालीय. दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर आत्महत्या प्रकरणात दिल्लीतल्या पटियाळा हाऊस कोर्टानं शशी थरूर यांना आरोपी ठरवलं आहे. न्यायालयानं समन्स बजावत 7 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 

टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, न्यायालयानं चार्जशीटच्या आधारे शशी थरूर यांनी सुनंदा पुष्कर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवला आहे. काँग्रेस नेता शशी थरूरविरोधात न्यायालयात ट्रायल सुरू होणार आहे. त्यांना 7 जुलै रोजी न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली पोलिसांनी 3 हजार पानांचं चार्जशीट पटियाळा हाऊस कोर्टात दाखल केलं आहे. त्याच्याच आधारे न्यायालयानं सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात शशी थरुर यांच्यावर आरोप लावले आहेत.या प्रकरणात काँग्रेस नेते शशी थरूर यांची पोलिसांनी ब-याचदा चौकशीही केली आहे. शशी थरूर यांच्याविरोधात खटला चालवण्यास पुरेसे पुरावे असल्याचंही दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं आहे. न्यायालयात भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली पोलिसांनी उत्तर दिलं आहे. सुब्रमण्यम स्वामींनी सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात शशी थरूर यांचा हात असल्याचा आरोप केला होता. 

टॅग्स :Shashi Thaoorशशी थरुरSunanda Pushkarसुनंदा पुष्करcongressकाँग्रेस