शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
2
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
3
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
4
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
5
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात
6
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
7
फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले?
8
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम
9
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
10
कोजागरी पौर्णिमा २०२५: कोजागरी ते लक्ष्मीपूजन, आर्थिक वृद्धीसाठी सलग १५ दिवस म्हणा 'हे' लक्ष्मी मंत्र!
11
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
12
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
13
Tarot Card: येत्या आठवड्यात प्रवास योग आणि आप्तेष्टांच्या भेटी सुखावतील; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
14
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
15
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
16
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
17
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
18
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
19
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
20
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा

महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 18:46 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: यात, राहुल गांधी यांच्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात 6 सभा होणार आहेत. प्रियांका गांधी बुधवारपासून महाराष्ट्रात चार सभा घेणार आहेत. तर काँग्रेसाध्यक्ष खर्गे दहा सभा घेणार आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर काँग्रेसचे विशेष लक्ष असेल.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष संपूर्ण ताकदीनिशी आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. यात आता, निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या ६ दिवसांत काँग्रेस आपली संपूर्ण ताकद लावणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, येत्या सहा दिवसांत कांग्रेसचे राष्ट्रीय आणि राज्यातील बडे नेते सुमारे नव्वद सभा घेणार आहेत. यांपैकी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियांका गांधी यांच्या सुमारे 20 सभा होणार आहेत.

यात, राहुल गांधी यांच्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात 6 सभा होणार आहेत. प्रियांका गांधी बुधवारपासून महाराष्ट्रात चार सभा घेणार आहेत. तर काँग्रेसाध्यक्ष खर्गे दहा सभा घेणार आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर काँग्रेसचे विशेष लक्ष असेल.

पटोले यांच्या २० तर इम्रान प्रतापगढी यांच्या वीसहून अधिक सभा? -काँग्रेसच्या स्टार प्रचारकांपैकी इम्रान प्रतापगढी यांच्या वीसहून अधिक, सचिन पायलट यांच्या सुमारे आठ, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले २० तर ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात १५ सभा घेणार आहेत. याशिवाय, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या देखील प्रचारात दिसणार आहेत. महत्वाचे म्हणजे, १७ नोव्हेंबरला मुंबईत काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांची संयुक्त सभाही होऊ शकते.

गॅरंटी कार्ड ५ कोटी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष -काँग्रेसने महा विकास अघाडीने दिलेल्या पाच मोठ्या आश्वासनांचे गॅरंटी कार्ड ५ कोटी घरांपर्यंत पोचवण्याचे टरवले आहे. यासाठी डोर टू डोर अभियान चलवले जात आहे.

महाविकास आघाडीच्या ५ गॅरेंटी -- महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ३००० रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास.- शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन.- जातनिहाय जनगणना करणार, ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील.- २५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे.- बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४००० रुपयांपर्यंत मदत. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीNana Patoleनाना पटोलेMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे