राजस्थानमध्ये काँग्रेसचा निर्णय, पाकिस्तानातील निर्वासित हिंदुंना अर्ध्या किंमतीत जमीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 12:22 IST2020-01-20T11:59:09+5:302020-01-20T12:22:58+5:30
भारतीय जनता पक्षाने देशातील हिंदूंसमोर काँग्रेला हिंदूविरोधी असल्याचे दर्शविले आहे. तसं अभियान भाजपकडून चालविण्यात आले आहे. त्याला उत्तर देण्यासाठी राजस्थानमधील काँग्रेस सरकारने पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंना आपलसं करण्याची मोहिम सुरू केली आहे.

राजस्थानमध्ये काँग्रेसचा निर्णय, पाकिस्तानातील निर्वासित हिंदुंना अर्ध्या किंमतीत जमीन
नवी दिल्ली - नागरिकता संशोधन कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. तर राजस्थानमध्ये अशोक गेहलोत सरकारने निर्वासित हिंदुंना नागरिकता दिल्यानंतर त्यांच्यासाठी जमीन आरक्षीत करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानातून आलेल्या 100 हिंदु कुटुंबांना राज्यातील काँग्रेस सरकारकडून अर्ध्या किंमतीत जामीनींच्या कागदपत्राचे वाटप करण्यात आले.
केंद्र सरकारच्या नागरिकता कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी गेहलोत सरकारने पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंना अर्ध्या दरात जमीन देऊ केली आहे. जयपूर विकास प्राधिकरणच्या वतीने 100 कुटुंबीयांना 50 टक्के दरात जमीन देण्यास सुरुवात केली आहे.
भारतीय जनता पक्षाने देशातील हिंदूंसमोर काँग्रेला हिंदूविरोधी असल्याचे दर्शविले आहे. तसं अभियान भाजपकडून चालविण्यात आले आहे. त्याला उत्तर देण्यासाठी राजस्थानमधील काँग्रेस सरकारने पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंना आपलसं करण्याची मोहिम सुरू केली आहे.
दरम्यान पाकिस्तानातून आलेल्या हिंदूना प्राधिकरणाची जमीन वाटप करत असताना काँग्रेस नेत्यांनी यापासून दूरावा ठेवला होता. यावर राजस्थान नगरविकास मंत्री म्हणाले की, काँग्रेस सरकार या शरणार्थींच्या भल्यासाठी काम करत असून त्यांच्या नावावर राजकारण करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.