घराणेशाही हीच काँग्रेसची संस्कृती; अमित शहांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 15:37 IST2017-09-25T15:33:37+5:302017-09-25T15:37:12+5:30

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या या वक्तव्यावर भाजपा अध्यक्ष अमित शहांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Congressional culture of dynastic rule; Amit Shah's reply to Rahul Gandhi | घराणेशाही हीच काँग्रेसची संस्कृती; अमित शहांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

घराणेशाही हीच काँग्रेसची संस्कृती; अमित शहांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी बर्कले युनिव्हर्सिटीमध्ये भाषण करताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतातील घराणेशाहीवर भाष्य केलं होतं.आपल्या भाषणातून राहुल गांधी यांनी अप्रत्यक्षपणे घराणेशाहीचं समर्थन केलं होतं. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या या वक्तव्यावर भाजपा अध्यक्ष अमित शहांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नवी दिल्ली- काही दिवसांपूर्वी बर्कले युनिव्हर्सिटीमध्ये भाषण करताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतातील घराणेशाहीवर भाष्य केलं होतं. आपल्या भाषणातून राहुल गांधी यांनी अप्रत्यक्षपणे घराणेशाहीचं समर्थन केलं होतं. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या या वक्तव्यावर भाजपा अध्यक्ष अमित शहांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘आमचा पक्ष हा कामगिरीवर लक्ष केंद्रीत करतो. पण काँग्रेसमध्ये मात्र घराणेशाहीलाच स्थान दिलं जातं. भाजपाचा कामगिरीवर, तर काँग्रेसचा घराणेशाहीवर विश्वास आहे,’ अशा शब्दांमध्ये अमित शहांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं आहे. सोमवारी झालेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत अमित शहा बोलत होते.

भाजपाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शहांनी काँग्रेसवर टीका केली. अमेरिकेतील बर्कले विद्यापीठात बोलताना राहुल गांधींनी भारतातील घराणेशाहीवर भाष्य केलं होतं. राहुल गांधींच्या या वक्तव्यावरूनच आज अमित शहांनी राहुल गांधींना लक्ष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांच्या कामामुळे सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचले, असं अमित शहा यांनी म्हंटलं आहे. ‘भाजपमध्ये कामगिरीला प्राधान्य दिलं जातं. पण काँग्रेसमध्ये घराणेशाहीलाच सर्वोच्च स्थान दिलं जातं.' अशा शब्दांत राहुल गांधींच्या विधानावर टीका करण्यात आली. अमित शहांसोबतच केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही राहुल गांधींवर टीका केली. राहुल गांधी सध्या भारताला कमी लेखत असून अमित शहांनी त्यांना योग्य उत्तर दिल्याचं पीयूष गोयल यांनी म्हंटलं आहे. 

दोन आठवड्यांपूर्वी बर्कले विद्यापीठात राहुल गांधींना एका व्यक्तीने घराणेशाहीबद्दल प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना भारतात सर्वच क्षेत्रांमध्ये घराणेशाही असल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी अभिषेक बच्चन, अखिलेश यादव ही देशातील घराणेशाहीची उदाहरणे आहेत, असंही म्हंटलं होतं. अभिनय, राजकारण आणि कॉर्पोरेट अशा सर्वच क्षेत्रांमध्ये घराणेशाही पाहायला मिळते. अशाच पद्धतीने देश चालतो,’ असे राहुल गांधींनी बर्कले विद्यापीठात म्हटलं होतं.

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला नवी दिल्लीत सुरुवात झाली असून बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. या बैठकीला भाजपाचे १५ मुख्यमंत्री, ६ उपमुख्यमंत्री, विधानसभेचे १४०० आमदार, विधान परिषदेचे ८५ आमदार, २८० मंत्री आणि ३३६ खासदार उपस्थित आहेत. 
 

Web Title: Congressional culture of dynastic rule; Amit Shah's reply to Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.