मोदी-शहांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी'; विधानसभेतील संख्याबळ घटलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 21:53 IST2019-10-24T21:52:59+5:302019-10-24T21:53:46+5:30
महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीसोबतच अजून एका राज्यात भाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे.

मोदी-शहांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी'; विधानसभेतील संख्याबळ घटलं!
अहमदाबाद - महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीसोबतच अजून एका राज्यात भाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे. गुजरातमधील सहा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये सत्ताधारी भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. बायड आणि थराड विधानसभा मतदारसंघात भाजपाला पराभव पत्करावा लागला होता. तसेच राधनपूर मतदारसंघातूनही भाजपाला पराभव पत्करावा लागला. राधनपूर मतदारसंघातून अल्पेश ठाकोर पराभूत झाले आहेत.
गुजरातमधील सहा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. त्यापैकी तीन मतदारसंघात भाजपाला विजय मिळाला, तर काँग्रेसने तीन ठिकाणी विजय मिळवला. काँग्रेसमधून भाजपात आलेले ओबीसी नेते अल्पेश ठाकोर पराभूत झाल्याने त्यांचे मंत्रिपद मिळवण्याचे स्वप्न भंगले आहे.
पोटनिवडणूक झालेल्या एकूण सहा मतदारसंघांपैकी बायड, थराड आणि राधनपूर मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळवला होता. तर भाजपाने अमरेवाडी, लुनावाला आणि खेरालू या मतदारसंघात विजय मिळाला.