‘काँग्रेस २१ दिवसांमध्ये नक्की करणार उमेदवार’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 06:52 IST2019-02-08T06:52:20+5:302019-02-08T06:52:34+5:30
येत्या २१ दिवसांत म्हणजेच या महिनाअखेरीस काँग्रेस आपले लोकसभेचे उमेदवार निश्चित करणार आहे.

‘काँग्रेस २१ दिवसांमध्ये नक्की करणार उमेदवार’
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : येत्या २१ दिवसांत म्हणजेच या महिनाअखेरीस काँग्रेस आपले लोकसभेचे उमेदवार निश्चित करणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरचिटणिसांच्या बैठकीत विचारविनिमय करून ही घोषणा करताना सांगितले की, यंदा अनुभवी नेत्यांबरोबरच अनुसूचित जाती-जमाती, तरुण तसेच महिलांना प्राधान्य दिले जाईल.
पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपालन यांनी सांगितले की, या बैठकीत सरचिटणिसांनी आपल्या राज्यातील स्थितीची माहिती दिली. त्यानंतर राहुल यांनी सांगितले की, आपण द्वेषजनक प्रचार करू नये. निवडणुकांचे महत्त्व सांगताना राहुल गांधी म्हणाले की, प्राणाची बाजी लावू, पण भाजपाला सत्तेतून बाहेर फेकू, या पद्धतीने आपण लढायचे आहे. सरचिटणीस प्रियंका गांधी बैठकीत म्हणाल्या की, उत्तर प्रदेशात आपले स्थान पुन्हा निर्माण करण्यासाठी आपण धर्म व जातींवर आधारित राजकारण तोडणे गरजेचे आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी व ज्योतिरादित्य सिंदिया ११ फेब्रुवारी रोजी लखनऊला सर्व जिल्हाध्यक्ष व स्थानिक नेत्यांशी चर्चा करतील. प्रियंका गांधी व ज्योतरादित्य सिंदिया तीन दिवस तिथे राहणार आहेत.