शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

आगामी निवडणुकांत काँग्रेस मुसंडी मारेल - सोनिया गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 6:23 AM

भाजपाला येत्या निवडणुकांत पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांशी आघाडी करण्याबाबत लवकरच धोरण निश्चित केले जाईल, असे सांगतानाच आगामी निवडणुकांत काँग्रेस आणि समविचारी पक्ष मिळूनच विजयी होतील, असा दावा यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी यांनी गुरुवारी केला.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : भाजपाला येत्या निवडणुकांत पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांशी आघाडी करण्याबाबत लवकरच धोरण निश्चित केले जाईल, असे सांगतानाच आगामी निवडणुकांत काँग्रेस आणि समविचारी पक्ष मिळूनच विजयी होतील, असा दावा यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी यांनी गुरुवारी केला. गुजरात व राजस्थानमधील निवडणुकांतून काँग्रेसकडे लोक वळू लागले असल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही त्या म्हणाल्या.गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारने लोकशाहीचे आधारस्तंभ असलेल्या संस्थाच नष्ट करण्याचे काम केले, असा आरोप करून सोनिया गांधी म्हणाल्या, संसद, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे यांच्यावरील हल्ले ही त्याची उदाहरणेच आहेत.आपल्या राजकीय विरोधकांच्या मागे तपास यंत्रणांचे शुक्लकाष्ट लावणे, त्यांना धमकावणे व आपल्या विरोधकांचा आवाज बंद करू पाहणे, हेच काम मोदी सरकार करीत आहे. धर्मनिरपेक्षा व लोकशाही यांचा गळा घोटण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न देशात सुरू आहे. शेकडो वर्षांपासूनचे आपले विविधतेत एकता हे वैशिष्ट्य व ताकद कमजोर केली जात आहे, असेही त्या म्हणाल्या.मोदी सरकार आर्थिक, कृषीविकास तसेच उद्योग व रोजगार यांबाबतमोठमोठी आश्वासने देते. पण प्रत्यक्षात परिस्थिती विपरीत आहे. शेतकरीआत्महत्या करीत आहेत, ग्रामीणअर्थव्यवस्था, लघू व मध्यम उद्योग अडचणीत आहेत, बेरोजगारी वाढत चालली आहे. नव्या नोकºया तर सोडाच, पण असलेल्यांचा रोजगारही जात आहे, काश्मीर जळत आहे, उत्तर प्रदेश व गुजरातमध्ये दलितांवर हल्ले वाढत आहेत. पण सरकार गप्प बसून आहे, अशी टीका करून त्या म्हणाल्या की, त्यासाठी कोणाची साक्ष काढण्याची गरजच नाही. संसदेत पंतप्रधानांनी केलेले भाषणच त्याचे उदाहरण आहे.राष्टÑवादीला सोबत घेऊयेत्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आम्ही राष्टÑवादीला सोबत घेऊ, शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि राष्टÑीय नेत्याला वगळून चालणार नाही. मात्र, कॉँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालीच या निवडणुका लढविल्या जातील, अशी माहिती काँग्रेसचे नेते मोतीलाल व्होरा यांनी दिली. महाराष्टÑात भाजपा-शिवसेना सरकारविरोधी वातावरण आहे. स्वबळावर लढण्यासाठी कॉँग्रेससाठी अत्यंत अनुकूल वातावरण आहे. त्यासाठी महाराष्टÑातील कॉँग्रेसच्या नेत्यांनी अंतर्गत राजकारण विसरत सरकारच्या उणिवा आणि प्रश्न घेऊन एकजुटीने लोकांपर्यंत गेले पाहिजे.नेत्यांच्या एकजुटीचे पक्षपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. राष्टÑवादीलाहीकॉँग्रेसची गरज आहे. शरद पवार हेज्येष्ठ नेते व आमचे जुने सहकारीआहेत त्यामुळे राष्टÑवादीसोबत आघाडी होईलच, असे खा. मोतीलाल व्होरायांनी सांगितले.>राहुल माझेही बॉसराहुल गांधी हेच आता आपले बॉस आहेत, असे सांगून सोनिया गांधी म्हणाल्या की, राहुल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केवळ काँग्रेसच मजबूत करू असे नव्हेतर, धर्मनिरपेक्ष मूल्यांचे रक्षणही करू.>कार्यकर्त्यांनी तयार राहावेआगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी पक्षाच्या खासदारांनी जनतेत जावे, त्यांच्याशी थेट संवाद साधावा, मोदी सरकारने आश्वासनांना कसा हरताळ फासला ते त्यांना सांगावे, असे सांगतानाच पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही गावागावांत, गल्लीबोळात जाऊ न काँग्रेसविषयी सकारात्मक वातावरण तयार करावे आणि लोकांच्या समस्या समजून घ्याव्यात, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस