शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 20:18 IST

काँग्रेस महासचिव तथा झारखंड प्रभारी गुलाम अहमद मीर यांनी गुरुवारी आश्वासन दिले आहे की, जर आपला पक्ष सत्तेत आला, तर घेसखोर असोत अथवा नसो, राज्यातील सर्व नागरिकांना 450 रुपयांत गॅस सिलिंडर दिला जाईल. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप-काँग्रेस समोरा-समोर आले आहेत...

आसामचे मुख्यमंत्री आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे भाजपचे सहप्रभारी हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेते गुलाम अहमद मीर यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. सरमा म्हणाले, मीर यांनी घुसखोरांना एलपीजी सिलिंडर देणार असल्याचे म्हटले आहे. हे सर्व काँग्रेसच्या व्होट बँकेला खूश करण्यासाठी केले जात आहे.

हिमंत बिस्वा सरमा म्हणाले, "गुलाम अहमद मीर म्हणतात की, ते घुसखोरांना स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर देतील, ते घुसखोरांना "माती आणि बेटी" दोन्ही देत आहेत, कारण ते काँग्रेसची व्होटबँक आहेत. ही भाषा राहुल गांधींची आहे. ते (गुलाम अहमद मीर) राहुल गांधींचा पाठींबा असल्याशिवाय असे बोलू शकत नाहीत. घुसखोरांसह, आपण काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे."

या वक्तव्यावरून पेटलाय वाद? -काँग्रेस महासचिव तथा झारखंड प्रभारी गुलाम अहमद मीर यांनी गुरुवारी आश्वासन दिले आहे की, जर आपला पक्ष सत्तेत आला, तर घेसखोर असोत अथवा नसो, राज्यातील सर्व नागरिकांना 450 रुपयांत गॅस सिलिंडर दिला जाईल. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप-काँग्रेस समोरा-समोर आले आहेत.  

'इंडिया' आघाडीचे स्पष्टीकरण -यासंदर्भात बोलताना, झारखंड प्रदेश काँग्रेस कमिटीने म्हटले आहे की, भाजप गुलाम अहमद मीर यांच्या विधानाचा विपर्यास करत आहे. तर, झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रवक्ते मनोज पांडे म्हणाले, "घुसखोरांसंदर्भात  भाजपची जी व्याख्या आहे, त्यात घुसखोर म्हणजे मुस्लीम आहेत. ही भाजपची विचारसरणी आहे. यासंदर्भात गुलाम अहमद मीर म्हणाले की, आमच्या आश्वासनानुसार सर्व धर्मातील लोकांना सिलिंडर मिळेल. यात, कोण हिंदू आहे आणि कोण मुसलमान हे बघितले जाणार नाही, सर्वांना सिलिंडर मिळेल."  

टॅग्स :jharkhand assembly election 2024झारखंड विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसinfiltrationघुसखोरी