Congress should apologize the country: Amit Shah | Rafale Verdict : अमित शहांचा काँग्रेसवर 'राफेल' हल्ला; म्हणाले, आता देशाची माफी मागा!
Rafale Verdict : अमित शहांचा काँग्रेसवर 'राफेल' हल्ला; म्हणाले, आता देशाची माफी मागा!

नवी दिल्ली: राफेल डील प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला आज (गुरुवारी) दुसऱ्यांदा क्लीन चिट मिळाल्यानंतर भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 

अमित शहा ट्विट करत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालानंतर मोदी सरकार पूर्णपणे भ्रष्टाचारमुक्त असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तसेच देशहितापेक्षा राजकारणच सर्वस्व असणाऱ्या काँग्रेसनं आता देशाची माफी मागावी असं म्हणत काँग्रेसवर अमित शहा यांनी टीका केली आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी देखील भाजपाचा सत्याचा विजय झाल्याचे सांगत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले होते.

दरम्यान, राफेल विमाने खरेदी करण्याचा व्यवहार रद्द व्हावा या मागणीसाठी केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने याआधीच फेटाळून लावली होती. या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. याप्रकरणीचा निकाल मे महिन्यात राखून ठेवण्यात आला होता. तसेच, राफेल खरेदी व्यवहारामध्ये मोदी सरकारने मोठा घोटाळा केला आहे, असा जाहीर आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात केला होता. त्यावरून त्यांनी रान उठविले होते.

Web Title: Congress should apologize the country: Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.