शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

"'ओ मित्रो' ओमायक्रॉनपेक्षा जास्त धोकादायक"; शशी थरूर यांचा पंतप्रधान मोदींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 15:55 IST

Congress Shashi Tharoor And Narendra Modi : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. याच दरम्यान ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. याच दरम्यान आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर (Congress Shashi Tharoor) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या 'ओ मित्रो'  या लोकप्रिय शब्दाची खिल्ली उडवली आहे. 

पंतप्रधान मोदी भाषणाची सुरुवात करण्यापूर्वी 'मित्रो' या शब्दाचा वापर करतात. शशी थरूर यांनी 'ओ मित्रो' या शब्दाची तुलना आता कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटसोबत केली आहे. 'ओ मित्रो' हे ओमाक्रॉनपेक्षा कितीतरी जास्त धोकादायक आहे असं म्हटलं आहे. शशी थरूर यांनी आपल्य़ा ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. यामध्ये "ओमायक्रॉनपेक्षा कितीतरी जास्त धोकादायक 'ओ मित्रो' आहे. दररोज आपण देशात वाढलेले ध्रुवीकरण, द्वेष आणि धर्मांधतेला चालना, संविधानावरील हल्ले आणि आपली लोकशाही कमकुवत होताना पाहत आहोत. या व्हायरसचा कोणताही ‘सौम्य प्रकार’ नाही" असं शशी थरूर यांनी म्हटलं आहे. 

शशी थरूर यांनी पंतप्रधान मोदींचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. थरूर यांच्या या ट्विटला भाजपाने उत्तर दिलं आहे. भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी देशात कोरोना व्हायरसची गंभीर परिस्थिती असताना असे राजकारण करणे चुकीचे आहे असं म्हटलं आहे. शहजाद पूनावाला यांनी "काँग्रेस महामारीला राजकारणाच्या वर ठेवू शकते का? आधी काँग्रेसने लसीबद्दल लोकांमध्ये संभ्रम पसरवला आणि आता म्हणतात की ओमायक्रॉन धोकादायक नाही. कोरोनाच्या सुरुवातीला अखिलेश यादव म्हणाले होते, की CAA करोना व्हायरसपेक्षा धोकादायक आहे. या लोकांना जबाबदारीची जाणीव नाही का? त्यांच्यासाठी कोरोनाला विरोध करण्यापेक्षा मोदींना विरोध करणं महत्त्वाचं झालं आहे का?" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण