शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

१२८ देशांच्या राजकीय पक्षांशी काँग्रेसचे संबंध -आनंद शर्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 5:48 AM

काँग्रेसचा पलटवार; भाजपचे असे संबंध नाहीत का?

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेस आणि चीनच्या कम्युनिस्ट पार्टीदरम्यानच्या समझोत्यावरून केल्या जात असलेल्या हल्ल्यावरून काँग्रेसने भाजपवर जोरदार पलटवार केला. काँग्रेसचे १२८ देशांच्या राजकीय पक्षांसोबत संबंध आहे. भाजपचे दुसऱ्या देशांतील राजकीय पक्षांशी संबंध नाहीत का? हे भाजपने आधी स्पष्ट करावे. भाजप ढोंग करीत असून, भाजपचा हा दुटप्पीपणा आहे, असे म्हणत काँग्रेसच्या विदेश व्यवहार विभागाचे प्रभारी आनंद शर्मा यांनी भाजपवर निशाणा साधला.स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेस जगातील राजकीय पक्षांसोबत पक्षस्तरीय संबंध प्रस्थापित करीत आहे. काँग्रेसचे आज जगातील १२८ देशांतील राजकीय पक्षांसोबत संबंध असून, सर्व मुद्यांवर पक्षपातळीवर विचारविनिमय केला जातो, असे सांगत आनंद शर्मा यांनी भाजपवर प्रश्नांची सरबत्ती केली.२०१५ मध्ये भाजपच्या एका सहयोगी संघटनेने चीनमध्ये समझोता करार स्वाक्षरित केला नव्हता का? राम माधव यांनी पक्षाचे प्रतिनिधी म्हणून चीनचे किती दौरे केले? आॅगस्ट २०१९ मध्ये भाजपचे ११ सदस्यांचे एक शिष्टमंडळ चीन दौºयावर असताना भाजपने चीनच्या कम्युनिस्ट पार्टीसोबत पक्षस्तरीय संबंध प्रस्थापित करण्याचे साकडे घातले नव्हते का? अशा प्रश्नांचा भडिमार करीत आनंद शर्मा यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला.सप्टेंबर २०१९ मध्ये भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांच्या नेतृत्वाखाली चीन दौºयावर गेलेल्या शिष्टमंडळात विजय चौथाईवाले यांचा समावेश होता.या शिष्टमंडळाचा उद्देश पक्षस्तरीय संबंध स्थापन करण्याचा नव्हता का? चौथाईवाले यांनी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस साँग ताओ यांना सुपूर्द केलेल्या अमित शहा यांच्या पत्रात काय लिहिले होते? हे भाजपने जाहीर करावे, असे आव्हानही त्यांनी केले.काँग्रेसने आज जगातील १२८ देशांतील राजकीय पक्षांशी संबंध असून, पक्षपातळीवर सर्व मुद्यांवर चर्चाही केली जाते. आफ्रिकेतील ४३ राजकीय पक्षांसोबत संबंधासोबत सहमती करारही आहे, असेही आनंद शर्मा यांनी स्पष्ट केले.राजकीय पक्षपातळीवर संबंधाची सुरुवात नेहरूंच्या काळात झाली. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी ही परंपरा चालू ठेवली. नेपाळी काँग्रेस, तत्कालीन सोव्हिएत संघातील कम्युनिस्ट पार्टीसोबत समझोता करार आहे. आजही ब्रिटनच्या मजूर पक्षासोबत सहमतीच्या आधारवर काँग्रेसचे संबंध आहेत. जर्मनी, रशियासह जगातील १२८ देशांत काँग्रेसचे सहमतीच्या आधारावर राजकीय पक्षांशी संबंध असून, ते आजही कायम आहेत.यात नावीन्य काही नाहीराजकीय पक्षांचे दुसºया देशांशी संबंध असण्यात काहीही नावीन्य नाही. काँग्रेसच्या अधिवेशनात विदेशी मित्र देशांचे प्रतिनिधीही सहभागी होत असतात. काँग्रेसने कोणत्या नेत्याने केव्हा आणि कोणत्या देशांसोबत पक्षस्तरीय समझोता करार केले, हे नीटसे आठवत नाही. तथापि, असे करार फक्त पक्षांसाठी होतात. सरकारशी त्याचा काहीही संबंध नसतो, तसेच सरकारसाठी बंधनकारक नसतात, असे काँग्रेसचे जुने नेते नटवर सिंह म्हणतात.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा