शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
2
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
3
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
4
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
5
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
6
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
7
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
8
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
9
बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी   
10
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
11
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर
12
राहुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना संधींचा काळ, लाभाचे शुभ योग; सुख-समृद्धीत वाढ, भाग्याची साथ!
13
मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत; अमित शाहांनी पुन्हा फटकारलं
14
IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर
15
Ganga Saptami 2024: गंगेत स्नान केल्याने खरोखरंच पाप धुतले जाते का? गंगासप्तमिनीत्त वाचा गंगा स्नानाचे महत्त्व!
16
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
17
Ganga Saptami 2024: गंगा सप्तमीला का केले जाते पितृतर्पण? ते कसे करायचे व त्यामुळे काय फळ मिळते? वाचा!
18
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
19
एका अटीवर सलमान खानला माफ करु शकतो बिष्णोई समाज, वाचा काय आहे नेमका तोडगा
20
"वारसा चालवण्यासाठी मुल जन्माला घालण्यात अर्थ नाही, जर..," पाहा काय म्हणाले Zerodhaचे Nikhil Kamath

Rahul Gandhi : "राहुल गांधी हे सध्याच्या भारतीय राजकारणातील 'राजकीय कुक्कू'"; भाजपाची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 9:29 AM

Congress Rahul Gandhi And BJP : भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावरून राहुल गांधींवर टीका केली आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi ) यांनी शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यानंतर आता भाजपाने (BJP) यावर पलटवार केला आहे. राहुल गांधींनी 'तो ठाम आहे, तो निर्भय आहे, इथेच आहे... भारताचा भाग्यविधाता!' असं ट्वीट केलं. पण या ट्वीटमध्ये त्यांनी एक चूक केली. त्यांनी आंदोलन करणाऱ्या ज्या शेतकऱ्यांचा फोटो शेअर केला तो फेब्रुवारीतला आहे. त्यामुळे भाजपाने यावरून राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला आहे. 'राहुल गांधी हे सध्याच्या भारतीय राजकारणातील 'राजकीय कुक्कू (कोकीळ)' अशी बोचरी टीका केली आहे. तसेच कोकीळ हा पक्ष कधीच आपलं घरटं बांधत नाही. तो कष्ट घेत नाही. हा दुसऱ्या पक्षांच्या घरट्यातून आनंद घेतो. राहुल गांधी सध्या असंच करत आहेत', अशा शब्दांत टीकास्त्र सोडलं आहे. 

भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावरून राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधी जमिनीवरून राजकारण करत नाही. पण ट्विटरवर सक्रिय असल्याने ते भ्रमाचं राजकारण करत आहेत. त्यांनी ट्वीट करून मुजफ्फरनगरमधील शेतकरी आंदोलनाचा खोटा फोटो दाखवला, असं संबित पात्रा म्हणाले. "राहुल गांधी हे भारतीय राजकारणातील राजकीय कुक्कू आहेत. जो दुसऱ्यांच्या घरट्यावर अवलंबून असतो. असंच राहुल गांधींचही आहे. आपल्या पक्षाला पुढे न नेणं, अध्यक्षाविना आपला पक्ष चालवणं,  कठोर परिश्रम न करणं आणि दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवण्याचा प्रयत्न करणं ही राहुल गांधींना वाईट सवय जडली आहे" असं म्हटलं आहे. 

"देशात जेव्हाही भ्रम आणि खोटारडेपणाचं राजकारण होतं, त्यामागे राहुल गांधींचाच असतो हात"

देशात जेव्हाही भ्रम आणि खोटारडेपणाचं राजकारण होतं, त्यामागे राहुल गांधींचा हात असतो, अशी टीका संबित पात्रा यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. तेलाच्या किमतीत वाढ झाल्याची थेट झळ देशातील सर्वसामान्य नागरिकाला बसते. जनतेच्या खिशावर याचा परिणाम होतो. प्रवास खर्च वाढल्यानं महागाई वाढते, पण याचा मोदी सरकारला काहीच फरक पडत नाही, असं राहुल म्हणाले. "पंतप्रधान मोदी वारंवार सांगतायत GDP वाढतोय. अर्थमंत्रीही म्हणतायत GDP वाढतोय. ते नेमकं कोणत्या GDP बाबत बोलत आहेत ते मला नंतर कळलं. 'Gas-Deisel-Petrol' असा त्याचा अर्थ आहे. त्यांनी जीडीपीबाबत गोंधळ निर्माण केलाय", असा खोचक टोला राहुल यांनी यावेळी लगावला. यानंतर भाजपाने त्याला देखील प्रत्युत्तर दिलं होतं. 

"G से गांधी, D से..."; भाजपा नेत्याने राहुल गांधींना सांगितला GDP चा नवा अर्थ, म्हणाले...

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (BJP Narottam Mishra) यांनी राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांना प्रत्युत्तर दिलं होतं. "राहुल गांधींना जीडीपीच्या अर्थ काय कळणार?" असा सवाल करत त्यांनी जीडीपीचा नवा अर्थ सांगितला. मिश्रा यांनी "राहुल गांधींसाठी जी म्हणजे गांधी (सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी), डी म्हणजे त्यांचे राजकीय गुरू दिग्विजय सिंह, पी म्हणजे पी. चिदंबरम. मग राहुल गांधींना जीडीपीचा अर्थ काय कळणार?" असा टोला राहुल गांधींवर टीका करताना लगावला होता.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारणSambit Patraसंबित पात्राFarmers Protestशेतकरी आंदोलन