शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
3
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
4
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
5
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
6
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
7
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
8
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
9
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
10
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
11
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
12
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
13
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
14
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
15
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
16
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

Hathras Gangrape : "उत्तर प्रदेशच्या 'वर्ग-विशेष' जंगलराजने आणखी एका तरुणीला मारलं", राहुल गांधींचा हल्लाबोल

By सायली शिर्के | Updated: September 29, 2020 19:32 IST

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे. 

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये 15 दिवसांपूर्वी एका 19 वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी तरुणीची जीभ देखील कापली. गंभीर अवस्थेत असलेल्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र मंगळवारी सकाळी पीडितीचे मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आहे. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे. 

"उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका तरूणीला मारून टाकलं" असं म्हणत राहुल गांधींनी जोरदार टीका केली आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "सरकारने म्हटलं की फेक न्यूज आहे आणि पीडितेस मरण्यासाठी सोडून दिलं. मात्र ही दुर्देवी घटना खोटी नव्हती, पीडितेचा मृत्यूही आणि सरकारचा निर्दयीपणा देखील खोटा नव्हता" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच प्रियंका गांधी यांनी देखील योगी सरकारवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशमधील कायदे व्यवस्था बिघडल्याचं म्हटलं आहे. 

क्रूरतेचा कळस! तरुणीवर सामूहिक बलात्कार; कापली जीभ 

हाथरसच्या चंदपा परिसरातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली होती. गावातील चार तरुणांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतर आरोपींनी तरुणीला मारहाण केली आणि तिची जीभ कापली. तिची गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्नही केला. यामध्ये तिला गंभीररित्या दुखापत झाली असून अलीगढच्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. तरुणीने तिच्यासोबत घडलेला प्रकार कोणालाही सांगून नये म्हणून तिची जीभ कापण्यात आली होती. 

केवळ इशारा करुन घडलेल्या दुष्कर्माची दिली होती माहिती 

14 सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेनंतर 19 सप्टेंबरला जेव्हा पीडितेचे म्हणणे नोंदवण्यासाठी पोलीस आले, तेव्हा ती बेशुद्ध झाली होती आणि तिला आपल्यासोबत घडलेल्या दुष्कर्माची माहिती सांगता आली नाही. 22 सप्टेंबरला पुन्हा पोलीस जेएन मेडिकल कॉलेजमध्ये हॅले आणि जबाब नोंदवला. त्यावेळी तिने केवळ इशारा करुन घडलेल्या दुष्कर्माची माहिती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आणि तुरूंगात पाठविले. जबाब घेणाऱ्याने/सीओने त्यांच्या उच्च अधिकऱ्यांना पाठवलेल्या दोन पानांच्या अहवालात ही माहिती दिली आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीyogi adityanathयोगी आदित्यनाथcongressकाँग्रेसIndiaभारतRapeबलात्कारPoliceपोलिसHathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कार