Rahul Gandhi : "हुकूमशाही प्रवृत्ती, भ्याडपणाचं लक्षण"; युथ काँग्रेस अध्यक्षांच्या अटकेवरुन राहुल गांधी आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 15:19 IST2026-02-24T15:15:21+5:302026-02-24T15:19:04+5:30
Congress Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी युथ काँग्रेस अध्यक्षांच्या अटकेवर भाष्य करताना म्हटलं की, "मला युवक काँग्रेसच्या माझ्या 'बब्बर शेर' सहकाऱ्यांचा अभिमान आहे आणि शांततापूर्ण आंदोलन हा आमचा ऐतिहासिक वारसा आहे."

Rahul Gandhi : "हुकूमशाही प्रवृत्ती, भ्याडपणाचं लक्षण"; युथ काँग्रेस अध्यक्षांच्या अटकेवरुन राहुल गांधी आक्रमक
AI समिटमधील ‘शर्टलेस’ आंदोलनामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मंगळवारी दिल्ली पोलिसांनी युथ काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चिब यांना अटक करून न्यायालयात हजर केलं. दिल्ली पोलिसांच्या या कारवाईवर काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. राहुल गांधी यांनी युथ काँग्रेस अध्यक्षांच्या अटकेवर भाष्य करताना म्हटलं की, "मला युवक काँग्रेसच्या माझ्या 'बब्बर शेर' सहकाऱ्यांचा अभिमान आहे आणि शांततापूर्ण आंदोलन हा आमचा ऐतिहासिक वारसा आहे."
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही या अटकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत 'X' (ट्विटर) अकाऊंटवरून पोस्ट करत, निषेध नोंदवणं हा प्रत्येक भारतीयाचा लोकशाही हक्क असल्याचं म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी अमेरिकेसोबत झालेला व्यापार करार हा देशाच्या हिताशी तडजोड असल्याचं सांगून केंद्र सरकारवर निशाणा साधला.
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "शांततापूर्ण विरोध हा आमचा ऐतिहासिक वारसा आहे. तो आमच्या रक्तात आहे आणि प्रत्येक भारतीयाचा लोकशाही अधिकार आहे. मला युवक काँग्रेसच्या माझ्या 'बब्बर शेर' सहकाऱ्यांचा अभिमान आहे, ज्यांनी 'COMPROMISED PM' विरोधात न घाबरता देशाच्या हितासाठी आवाज उठवला."
शांतिपूर्ण विरोध हमारी ऐतिहासिक धरोहर है। यह हमारे खून में है और हर भारतीय का लोकतांत्रिक अधिकार है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 24, 2026
मुझे युवा कांग्रेस के अपने बब्बर शेर साथियों पर गर्व है, जिन्होंने ‘COMPROMISED PM’ के खिलाफ निडर होकर देश के हित में आवाज़ उठाई है।
अमेरिका के साथ हुए Trade Deal में देश के…
"हे सत्य देशासमोर मांडल्याबद्दल युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चिब आणि इतर सहकाऱ्यांना अटक करणं, हे हुकूमशाही प्रवृत्ती आणि भ्याडपणाचं लक्षण आहे. काँग्रेस पक्ष आणि मी माझ्या सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. सत्तेला सत्याचा आरसा दाखवणं हा गुन्हा नसून देशभक्ती आहे. घाबरू नका – सत्य आणि संविधान आपल्यासोबत आहे."
भारत-अमेरिका व्यापार करारावर भाष्य करताना त्यांनी लिहिलं की, "अमेरिकेसोबतच्या व्यापार करारात देशाच्या हिताशी तडजोड करण्यात आली आहे. या करारामुळे आपल्या शेतकऱ्यांचे आणि कापड उद्योगाचे नुकसान होईल, तसेच आपला डेटा अमेरिकेच्या हाती सोपवला जाईल." काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी "युथ काँग्रेस घाबरणार नाही. आम्ही जनतेचा आवाज उठवत राहू आणि लढत राहू. आज देशातील वातावरण अत्यंत खराब झालं आहे" असं म्हटलं आहे.