द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडू: राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 12:01 IST2022-12-25T12:00:41+5:302022-12-25T12:01:51+5:30

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ १०७ दिवसांत तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून राजधानी दिल्लीत दाखल झाली.

congress rahul gandhi said let open a shop of love in the market of hate in bharat jodo yatra | द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडू: राहुल गांधी

द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडू: राहुल गांधी

नवी दिल्ली :काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ १०७ दिवसांत तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून शनिवारी राजधानी दिल्लीत दाखल झाली. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी या त्यांच्यासोबत यात्रेत सहभागी झाल्या. 

ज्येष्ठ अभिनेते कमल हासन हेही भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. तुमच्या द्वेषाच्या बाजारात मी प्रेमाचे दुकान उघडायला आलो आहे, असे मी आरएसएस व भाजपच्या लोकांना सांगितल्याचे राहुल गांधी म्हणाले.

दिल्लीत आल्यावर राहुल गांधी यांनी प्रथम आश्रम चौकातील जयराम आश्रमातील सीयाराम दरबाराचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी हजरत निजामुद्दिन औलिया यांच्या दर्ग्यात जाऊन चादर चढवली. सायंकाळी लाल किल्ल्यावर यात्रा पोहोचली. यात्रा  ९ दिवस स्थगित राहणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: congress rahul gandhi said let open a shop of love in the market of hate in bharat jodo yatra