"पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने भारतापेक्षा...", राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 12:33 PM2020-10-16T12:33:53+5:302020-10-16T12:56:06+5:30

Congress Rahul Gandhi And Modi Government : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

congress rahul gandhi hits modi government over india declining gdp growth | "पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने भारतापेक्षा...", राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

"पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने भारतापेक्षा...", राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

googlenewsNext

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) वर्तवलेल्या अंदाजानुसार या आर्थिक वर्षात भारताच्या दर डोई जीडीपीत 10.3 टक्क्यांची घट होईल. आयएमएफचा हा अंदाज सत्य सिद्ध झाल्यास दर डोई जीडीपीत भारतबांगलादेशपेक्षाही खाली जाईल. यावरूनच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. कोरोना व्हायरस, भारत-चीन तणाव, बेरोजगारी यासह अनेक प्रकरणावरून राहुल गेल्या कित्येक दिवसांपासन मोदींवर टीकास्त्र सोडत आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

राहुल गांधी यांनी शुक्रवारी (16 ऑक्टोबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केलं आहे. तसेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने भारतापेक्षा अधिक चांगल्याप्रकारे कोरोना परिस्थिती हाताळल्याचं म्हटलं आहे. "भाजपा सरकारची आणखी एक जबरदस्त कामगिरी. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने आपल्यापेक्षा अधिक चांगल्याप्रकारे कोरोना परिस्थिती हाताळली आहे" असं ट्विट राहुल यांनी केलं आहे. यासोबत राहुल यांनी आयएमएफच्या आकड्यांच्या संदर्भ देखील दिला आहे.  

IMF Report : यावर्षी बांगलादेशातील नागरिकांपेक्षाही कमी होणार भारतीयांची कमाई!

आयएमएफचा मंगळवारी जारी झालेला अहवाल World Economic Outlook नुसार, 31 मार्च 2021रोजी संपणाऱ्या या आर्थिक वर्षात भारताच्या दर डेई जीडीपीत 10.3 टक्क्यांची घट होऊन तो 1877 डॉलरवर येईल. आयएमएफच्या अहवालानुसार, बांगलादेशचा दरडोई जीडीपी 2020मध्ये 4 टक्क्यांनी वाढून 1888 डॉलरवर पोहोचण्याचा अंदाज आहे. यापूर्वी जून महिन्यात आयएमएफने यात 4.5 टक्क्यांची घट होण्याचा अंदाज वर्तवला होता. असे असले, तरी पुढील आर्थिक वर्षात आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारताचा आर्थिक विकासदर 8.8 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. असे झाल्यास भारत पुन्हा एकदा सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरेल. यादरम्यान चीनचा विकासदर 8.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेत 4.4 टक्क्यांची घसरण 

आयएमएफच्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात जागतिक आर्थव्यवस्थेत 4.4 टक्क्यांची घट होऊ शकते. वर्ष 2021मध्ये यात 5.2 टक्क्यांचीही मोठी वृद्धी होऊ शकते. आयएमएफच्या अहवालात म्हणण्यात आले आहे, की 2020दरम्यान जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये केवळ चीनच्या जीडीपीमध्येच 1.9 टक्क्यांची वाढ नोंदवली जाईल.

"जवानांसाठी नॉन बुलेटप्रुफ ट्रक आणि पंतप्रधानांसाठी 8400 कोटींचं विमान", राहुल गांधींचा घणाघात

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींवर पुन्हा निशाणा साधला होता. "आपल्या जवानांना नॉन बुलेटप्रुफ ट्रकांमधून शहीद होण्यासाठी पाठवलं जात आहे आणि पंतप्रधानांसाठी 8400 कोटी रुपयांचं विमान मागवलं जात आहे, हा न्याय आहे का?" असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला होता. राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एका ट्रकमध्ये जवान बसलेले दिसत आहेत. ते एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. यामध्ये एका जवानांनी 'नॉन बुलेटप्रुफ गाड्यांमधून पाठवून आपल्या जीवासोबत खेळलं जातं आहे' असं म्हटलं आहे. त्यामुळे राहुल यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. याआधी त्यांनी ट्विटरवरून टीकास्त्र सोडलं होतं. "पंतप्रधानांनी आपल्यासाठी 8400 कोटी रुपयांचं विमान खरेदी केलं. एवढ्या पैशांत तर सियाचिन लडाख सीमेवर तैनात आपल्या जवानांसाठी कितीतरी गोष्टी खरेदी करता आल्या असत्या. गरम कपडे 30 लाख, जॅकेट-ग्लोव्हज 60 लाख, बूट 67 लाख 20 हजार, ऑक्सिजन सिलिंडर 16 लाख 80 हजार, पंतप्रधानांना केवळ स्वत:च्या प्रतिमेची काळजी आहे सैनिकांची नाही" असं म्हटलं होतं. 

Web Title: congress rahul gandhi hits modi government over india declining gdp growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.