शहरं
Join us  
Trending Stories
1
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
2
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
3
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
4
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
5
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
6
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
7
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
8
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
9
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
10
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
11
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
12
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
13
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
14
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
15
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
16
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
17
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
18
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
19
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
20
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

तरुणांना भाषण नको, नोकऱ्या पाहिजेत; प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 9:01 PM

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी दीर्घकाळापासून रखडलेल्या एसएससी आणि रेल्वे परीक्षांवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

ठळक मुद्देकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीडीपीवरून घेराव घातला.मंत्रालयाच्या आकड्यांनुसार पहिल्या तिमाहीत स्थिर किंमतीवर म्हणजेच रियल जीडीपी 26.90 लाख कोटी रुपये राहिली आहे.

नवी दिल्ली : कोरोना आणि चीनसोबतच्या सीमा वादावरून केंद्रातील मोदी सरकारला घेराव घालणाऱ्या काँग्रेसने आता देशातील वाढती बेरोजगारी आणि मंदावलेल्या अर्थव्यवस्थेवरुन निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी दीर्घकाळापासून रखडलेल्या एसएससी आणि रेल्वे परीक्षांवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तरुणांना भाषण नको आहे, नोकऱ्या पाहिजे आहेत, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

"एसएससी आणि रेल्वेच्या अनेक परीक्षांचे निकाल अनेक वर्षांपासून रोखले आहेत. काहींचे निकाल अडकले आहेत, तर कुणाची परीक्षा राहिली आहे. सरकार तरुणांच्या संयमाची परीक्षा किती काळ घेणार? तरुणांचा आवाज ऐका. तरुणांना भाषण नको आहे, तर नोकऱ्या पाहिजेत," असे ट्विट करत प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे.

दरम्यान, याआधी सहा महिन्यापूर्वी राहुल गांधी यांनी आर्थिक त्सुनामी येणार असल्याचे सांगितले होते, असे म्हणत प्रियंका गांधी यांनी ट्विटरवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. "सहा महिन्यांपूर्वी राहुल गांधी आर्थिक त्सुनामीबाबत बोलले होते. कोरोना संकटावेळी हत्तीच्या दातांसारखे दाखवणारे एक पॅकेज घोषित झाले. मात्र, आजची परिस्थिती पाहा. जीडीपी @ -23.9 टक्के, भाजपा सरकारने अर्थव्यवस्थेला बुडविले," असे ट्विट प्रियंका गांधी यांनी केले होते.

याचबरोबर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीडीपीवरून घेराव घातला. राहुल गांधी यांनी ट्वीट करून म्हटले होते की, "जीडीपी 24% घसरला आहे. स्वातंत्र्य भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण आहे. प्रत्येक इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत राहणे, हे सरकारचे दुर्दैव आहे." याशिवाय, काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला. "मोदीजी, आता तरी मान्य करा की ज्याला तुम्ही "मास्टर स्ट्रोक" म्हटले, तो खरंतर "आपत्ती स्ट्रोक" होता! नोटाबंदी, चुकीची जीएसटी आणि देशबंदी (लॉकआऊट), असे रणदीत सुरजेवाला यांनी म्हटले होते.

दरम्यान, केंद्रीय मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2020-21 च्या एप्रिल ते जून या तिमाहीचे आकडे जाहीर केले आहेत. मंत्रालयाच्या आकड्यांनुसार पहिल्या तिमाहीत स्थिर किंमतीवर म्हणजेच रियल जीडीपी 26.90 लाख कोटी रुपये राहिली आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीत ही जीडीपी 35.35 लाख कोटी रुपये होती. अशाप्रकारे यामध्ये 23.9 टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या वर्षी जीडीपीमध्ये 5.2 टक्क्यांची वाढ झाली होती. देशात लॉकडाऊन असल्याने एप्रिल आणि मे महिन्यात सारे काही बंद होते. यामुळे अर्थव्यवस्थाच ठप्प झाली होती. जूनमध्ये याला थोडा वेग आला होता. यामुळे रेटिंग एजन्सी आणि अर्थतज्ज्ञांनी जून तिमाहीमध्ये जीडीपीदरात 16 ते 25 टक्के घट होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला होता. 

कृषीवगळता अन्य सर्वच क्षेत्रांना बसला मोठा फटका देशाच्या कृषिक्षेत्राने या तिमाहीत ३.४ टक्के एवढी वाढ दिली आहे. मागील वर्षी ही वाढ ३ टक्के एवढी होती. सर्वाधिक फटका बांधकाम क्षेत्राला बसला आहे. हे क्षेत्र यंदा मात्र ५०.३ टक्क्यांनी घसरले आहे. उत्पादन क्षेत्रातही ३९.३ टक्क्यांनी घट झाली आहे. खाण क्षेत्र (२३.३ टक्के), ऊर्जा क्षेत्र (७ टक्के), व्यापार, हॉटेल, परिवहन, दळण वळण आणि सेवा क्षेत्रामध्ये ४७ टक्क्यांनी घट झाली आहे. आर्थिक क्षेत्र तसेच स्थावर मालमत्ता यामध्ये ५.३ टक्के तर सामान्य प्रशासन, संरक्षण आणि अन्य सेवांच्या क्षेत्रात १०.३ टक्के अशी घट झाली आहे.

आणखी बातम्या...

- Gold-Silver Price : सोने पुन्हा महागले; चांदीच्या किंमतीत 2000 रुपयांपेक्षा जास्त वाढ, पाहा आजचे दर

- भाजपात प्रवेश करणार होता हिस्ट्रीशीटर, पोलिसांना पाहताच ठोकली धूम

- चारू सिन्हा यांची सीआरपीएफ श्रीनगर सेक्टरच्या महानिरीक्षकपदी नियुक्ती    

- 'या' कंपनीकडून Permanent Work From Homeची सुविधा, ७५ टक्के कर्मचारी करणार घरून काम

- "राहुल गांधींनी 6 महिन्यांपूर्वी दिला होता इशारा", जीडीपीवरून प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा    

- 'लाल डोळे कधी दिसणार?', चिनी सैनिकांच्या घुसखोरीवरून काँग्रेसचा नरेंद्र मोदींवर निशाणा     

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस