congress priyanka gandhi vadra called cbse irresponsible for conducting board exams during corona time | Coronavirus : "बोर्डाच्या परीक्षा रद्द करा किंवा..." प्रियंका गांधींनी CBSE ला फटकारलं

Coronavirus : "बोर्डाच्या परीक्षा रद्द करा किंवा..." प्रियंका गांधींनी CBSE ला फटकारलं

ठळक मुद्देदेशात मोठ्या प्रमाणात वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्या१ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करून केली परीक्षा रद्द अथवा ऑनलाइन घेण्याची मागणी

देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्यानं वाढत आहे. अशा परिस्थितीत मे महिन्यात होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची किंवा ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी वाढत आहे. दरम्यान, काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधीदेखील विद्यार्थ्यांच्या बाजूनं पुढे आल्या आहेत. कोरोनासारख्या या कठोर परिस्थितीत त्यांनी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षा देण्यास सांगितल्यामुळे प्रियंका गांधी यांनी CBSE बोर्डाला फटकारलं असून ते विद्यार्थ्यांविषयी बेजबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

"सध्याच्या परिस्थितीत सीबीएसईसारख्या बोर्डांनी विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास भाग पाडणे हे बेजबाबदारपणाचं आहे. बोर्ड परीक्षा एकतर रद्द कराव्यात किंवा शेड्यूल केल्या पाहिजेत अथवा परीक्षा अशा प्रकारे घ्याव्यात की गर्दी असलेल्या केंद्रांमध्ये मुलांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक नसेल," असं प्रियंका गांधी म्हणाल्या. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सीबीएसई बोर्डाला फटकारलं.विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याची मागणी

सध्या देशभरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या १ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी स्वाक्षऱ्या करून मे मध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करणं किंवा त्या ऑनलाइन पद्धतीनं घेण्याची मागणी केली आहे. परंतु सीबीएसई आणि काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशननं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: congress priyanka gandhi vadra called cbse irresponsible for conducting board exams during corona time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.