शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

"प्रियंका गांधींचं आंदोलन दडपण्यासाठीच फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅप केलं बंद"; काँग्रेसचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 12:06 IST

Congress Priyanka Gandhi And Facebook Whatsapp : प्रियंका गांधी यांचं आंदोलन दडपण्यासाठीच फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅप बंद करण्यात आल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे.

नवी दिल्ली - फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप हे काही तांत्रिक कारणांमुळे सोमवारी रात्रीपासून तब्बल सहा तासांसाठी बंद झाले होते. ठप्प झालेल्या या सेवेमुळे सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आलं. देशामध्ये याला राजकीय वळण देखील दिलेलं पाहायला मिळत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप बंद झाल्यानंतर अनेकांनी यासाठी मोदी सरकारला दोषी ठरवलं. याच दरम्यान प्रियंका गांधी यांचं आंदोलन दडपण्यासाठीच फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅप बंद करण्यात आल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. अगदी काँग्रेसच्या खासदारांपासून ते आपच्या नेत्यांपर्यंत सर्वांनीच हा दावा केल्याचं आता पाहायला मिळत आहे.

काँग्रेसचे खासदार उदित राज यांनी याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. "असं दिसतंय की, जणू केंद्र सरकारने फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम जाणीवपूर्वक बंद केलं आहे. प्रियंका गांधीजींची चळवळ दडपली जाईल, यासाठी हे करण्यात आलं" असा दावा उदित राज यांनी केला आहे. तर, आम आदमी पक्षाचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी देखील अशीच प्रतिक्रिया दिली आहे. "भाजप मंत्र्याच्या दुष्कर्माचा व्हिडीओ आल्यापासून फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅप बंद झाले आहेत. भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकतो" असं सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं आहे. 

"लखीमपूर शेतकरी नरसंहाराचं सत्य दडपण्यासाठी जाणीवपूर्वक केलं गेलं आहे?"

काँग्रेस नेत्या पंखुरी पाठक यांनी "व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक यापूर्वी कधी इतका वेळ बंद होतं का? हे डाऊन झालं आहे की लखीमपूर शेतकरी नरसंहाराचं सत्य दडपण्यासाठी जाणीवपूर्वक केलं गेलं आहे? नवीन व्हिडिओ व्हायरल होण्यापासून रोखण्यासाठी?" असं म्हटलं आहे. तसेच पंखुरी पाठक यांनी आपल्या दुसऱ्या पोस्टमध्ये "वायफाय आणि मोबाईल इंटरनेटचा स्पीड देखील कमी करण्यात आला आहे. जिओ अनेक लोक वापरतात, तेही बंद करण्यात आलं आहे. टीव्हीनंतर आता या लोकांना इंटरनेटवरील बातम्या आणि माहितीवर देखील पूर्ण नियंत्रण हवं आहे. हे खूप धोकादायक आहे" असं म्हटलं आहे. 

"अन्नदात्याला चिरडणारी ही व्यक्ती अद्याप अटकेत नाही, असं का?"

प्रियंका गांधी गेल्या कित्येक तासांपासून पोलिसांच्या ताब्यात आहेत. याच दरम्यान आता त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. "अन्नदात्याला चिरडणारी ही व्यक्ती अद्याप अटकेत नाही, असं का?" असा संतप्त सवाल करत प्रियंका यांनी जोरदार निशाणा साधला आहे. प्रियंका यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "नरेंद्र मोदीजी तुमच्या सरकारने कोणत्याही आदेश किंवा एफआयआरशिवाय मला गेल्या 28 तासांपासून ताब्यात ठेवलं आहे. अन्नदात्याला चिरडणारी ही व्यक्ती अद्याप अटकेत नाही, असं का?" अशी विचारणा प्रियंका यांनी ट्विटमधून केली आहे. यावेळी त्यांनी त्यादिवशी झालेल्या घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.  

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारFacebookफेसबुकWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप