राहुल गांधी 31 ऑगस्टपासून कैलास मानसरोवर यात्रा करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 13:17 IST2018-08-29T13:15:38+5:302018-08-29T13:17:35+5:30

तिबेट-चीनमार्गे कैलास मानसरोवरला जाण्याची शक्यता

congress president Rahul Gandhi to go to Kailash Mansarovar on August 31 | राहुल गांधी 31 ऑगस्टपासून कैलास मानसरोवर यात्रा करणार

राहुल गांधी 31 ऑगस्टपासून कैलास मानसरोवर यात्रा करणार

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी 31 ऑगस्टपासून कैलास मानसरोवर यात्रा करणार आहेत. राहुल गांधी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीवेळी कैलास मानसरोवर यात्रा करण्याचा मानस व्यक्त केला होता. राहुल गांधी नेपाळमार्गे कैलास मानसरोवरला जाणार नाहीत, असं वृत्त अनेक संकेतस्थळांनी दिलं आहे. त्याऐवजी ते तिबेट-चीनमार्गे कैलास मानसरोवरला जातील. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राहुल गांधी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. मात्र अखेर त्यांचं विमान सुरक्षित लँड झालं. त्यानंतर बोलताना राहुल गांधींनी तांत्रिक बिघाडाचा उल्लेख केला होता. 'विमान काही वेळ हवेतच थांबलं. लवकरच कैलास मानसरोवरला भेट द्यायला हवी, असा विचार त्याक्षणी माझ्या मनात येऊन गेला,' असं राहुल गांधी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले होते. काँग्रेसनं तांत्रिक बिघाडाबद्दल पोलीस तक्रार दाखल केली होती. राहुल गांधींच्या विमानात जाणूनबुजून बिघाड करण्यात आला, असा आरोप काँग्रेसनं केला होता. 

Web Title: congress president Rahul Gandhi to go to Kailash Mansarovar on August 31