शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

निवडणूक आयोगाच्या नियमात बदल, काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव; जाणून घ्या नवे नियम..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 15:55 IST

Congress Plea: निवडणूक आयोगाच्या शिफारशीच्या आधारावर, केंद्रीय कायदा मंत्रालयाने शुक्रवारी निवडणूक आचार नियम, 1961 च्या नियम 93 (2) (ए) मध्ये सुधारणा केली आहे.

Congress Plea in Supreme Court: हरयाणा आणि महाराष्ट्र निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने ईव्हीएमचा मुद्दा लावून धरला आहे. अशातच, निवडणूक आयोगाच्या नियमांमध्ये बदल करण्याबाबत केंद्र सरकारने नुकत्याच दिलेल्या निर्णयाविरोधात काँग्रेसनेसर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी मंगळवारी (24 डिसेंबर 2024) यासंदर्भात याचिका दाखल केली. 

सीसीटीव्ही कॅमेरे आणि वेबकास्टिंग फुटेज तसेच उमेदवारांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग, यांसारख्या इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्सची सार्वजनिक तपासणी रोखण्यासाठी केंद्र सरकारने निवडणूक नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यांचा गैरवापर थांबवणे हा यामागचा उद्देश असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. हे बदल शुक्रवारी (20 डिसेंबर 2024) लागू करण्यात आले. आता याविरोधात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, या प्रकरणी लवकरच सुनावणी होणार आहे.

जयराम रमेश यांनी एक्सवर माहिती याचिका दाखल केल्यानंतर जयराम रमेश यांनी म्हटले की, निवडणूक आचार नियम, 1961 च्या अलीकडील सुधारणांना आव्हान देणारी रिट सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे, म्हणून सार्वजनिक सल्लामसलत न करता अशा महत्त्वपूर्ण नियमात एकतर्फी आणि निर्लज्जपणे सुधारणा करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. निवडणूक प्रक्रियेतील अखंडता झपाट्याने कमी होत आहे. आशा आहे की, सर्वोच्च न्यायालय ते पुनर्संचयित करण्यात मदत करेल..

दुरुस्तीने काय बदलणार?निवडणूक आयोगाच्या (EC) शिफारशीच्या आधारे केंद्रीय कायदा मंत्रालयाने शुक्रवारी सार्वजनिक तपासणीसाठी उघडलेल्या कागदपत्रांचे प्रकार प्रतिबंधित करण्यासाठी निवडणूक आचार नियम, 1961 च्या नियम 93(2)(A) मध्ये सुधारणा केली. म्हणजेच आतापासून निवडणुकीशी संबंधित सर्व कागदपत्रे जनतेला उपलब्ध होणार नाहीत. सरकारने नव्या बदलात केलेल्या दुरुस्तीनुसार, आता केवळ 1961 च्या निवडणूक नियमांची कागदपत्रेच सार्वजनिक तपासणीसाठी उपलब्ध असतील. सोप्या शब्दात, केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या या बदलामुळे, जनता यापुढे निवडणुकीशी संबंधित सर्व कागदपत्रांची तपासणी करू शकणार नाही. केवळ निवडणूक नियमांच्या अंमलबजावणीशी संबंधित कागदपत्रे लोकांसाठी उपलब्ध असतील.

टॅग्स :congressकाँग्रेसSupreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपा