जुने पराभव विसरून नव्या जोमाने सुरुवात; बिहार फत्ते करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 21:22 IST2025-02-18T21:22:06+5:302025-02-18T21:22:53+5:30

Congress on Bihar Election : या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये निवडणुका होत असून, यासाठी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे.

Congress on Bihar Election: Forgetting old defeats and starting with new vigor; Congress active in Bihar, will it contest on its own this time? | जुने पराभव विसरून नव्या जोमाने सुरुवात; बिहार फत्ते करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली...

जुने पराभव विसरून नव्या जोमाने सुरुवात; बिहार फत्ते करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली...

Congress on Bihar Election : मागील काही निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पुन्हा सक्रिय झाली आहे. काँग्रेसने या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यंदा काँग्रेसची नजर बिहारमधील दलित व्होटबँकेवर आहे. याच रणनीतीअंतर्गत राहुल गांधींनी या वर्षात आतापर्यंत दोनदा पाटण्याचा दौरा केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या महिन्यात बिहारमध्ये दोन सभा घेणार आहेत. त्यानंतर प्रियंका गांधी मार्चमध्ये कार्यक्रम बिहारला जात आहेत. पक्षाने आपल्या राज्य नेतृत्वालाही निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

खरगेंच्या बॅक टू बॅक सभा
मल्लिकार्जुन खरगे येत्या 22 फेब्रुवारीला बक्सर येथे सभा घेणार आहेत. तर, त्यानंतर 28 फेब्रुवारीला पश्चिम चंपारणमध्येही खरगेंच्या सभेची तयारी सुरू आहे. खरगेंच्या सभांना जय बापू, जय भीम, जय संविधान अशी नावे देण्यात आली आहेत. याद्वारे काँग्रेसला बिहारमधील दलित मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी राहुल गांधींच्या दोन्ही कार्यक्रमांचा भर फक्त दलित मतदारांवर होता. 

काँग्रेस-राजद युतीमध्ये एकही मोठा दलित नेता नाही
बिहारमधील पासवान समाजातील चिराग पासवान आणि जीतन राम मांझी हे मांझी समाजाचे मोठे नेते असून, दोघेही सध्या एनडीएचा भाग आहेत. या दोन जातींशिवाय बिहारमध्ये दलित समाजाची मोठी संख्या आहे, पण काँग्रेस-राजद युतीमध्ये एकही मोठा दलित नेता नाही. बिहारमध्ये या समाजात शिरकाव करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. पण प्रश्न असा पडतो की काँग्रेसचे सर्वोच्च नेतृत्व सतत बिहारचे दौरे का करत आहे? बिहारमध्ये काँग्रेस एकट्याने निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे का?

काँग्रेसला ताकद दाखवायची आहे
सूत्रांचे म्हणणे आहे की, काँग्रेस एकट्याने निवडणूक लढवणार नाही, पण काँग्रेसला आरजेडीसोबत जागावाटप करण्यापूर्वी आपली ताकद दाखवायची आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्तर जागा मिळाल्या होत्या, त्यापैकी केवळ एकोणीस जागा जिंकता आल्या. काँग्रेसमुळे तेजस्वी मुख्यमंत्री होऊ शकले नाही, असा संदेश गेला होता. अशा स्थितीत यंदा राजद काँग्रेसला चाळीसपेक्षा जास्त जागा देण्यास तयार नाही. याशिवाय इतर काही पक्षही जागांची मागणी करत आहेत. 

यामुळेच काँग्रेसला बिहारमधील आघाडीत सक्तीच्या आघाडीऐवजी मजबूत भागीदाराची भूमिका बजावायची आहे. आपल्या जागांचा कोटा कायम ठेवण्याबरोबरच काँग्रेस भक्कम जागा मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या वेळी काँग्रेसला त्यांच्या पसंतीच्या जागा मिळाल्या नाहीत. यावेळी त्यांच्या पसंतीच्या जागा मिळाल्यास कमी जागांवर तडजोड होऊ शकते, असे काँग्रेसच्या सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळेच काँग्रेसने आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. 

 

Web Title: Congress on Bihar Election: Forgetting old defeats and starting with new vigor; Congress active in Bihar, will it contest on its own this time?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.