शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

भाजप विजयी होऊनही काँग्रेस सशक्त; भाजपाच्या १६ जागा कमी; कॉंग्रेसला १९ जागांचा फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 01:40 IST

गुजरातच्या मतदारांनी भाजपला ९९ जागा देऊन सहाव्यांदा सत्तास्थानी बसवले असले तरी कॉंग्रेसलाही नाकारलेले नाही. उलट सशक्त विरोधी पक्षाच्या स्वरूपात नव्या विधानसभेत कॉंग्रेसला स्थान दिले आहे. मुख्य म्हणजे काँग्रेसतर्फे जे ८0 जण विजयी झाले, त्यापैकी बहुसंख्य नवे चेहरे आहेत. १९९८ नंतर भाजपा प्रथमच २०१७ मध्ये दोन अंकी संख्या घेऊन सत्तारोहण करीत आहे.

महेश खरे सुरत : गुजरातच्या मतदारांनी भाजपला ९९ जागा देऊन सहाव्यांदा सत्तास्थानी बसवले असले तरी कॉंग्रेसलाही नाकारलेले नाही. उलट सशक्त विरोधी पक्षाच्या स्वरूपात नव्या विधानसभेत कॉंग्रेसला स्थान दिले आहे. मुख्य म्हणजे काँग्रेसतर्फे जे ८0 जण विजयी झाले, त्यापैकी बहुसंख्य नवे चेहरे आहेत.१९९८ नंतर भाजपा प्रथमच २०१७ मध्ये दोन अंकी संख्या घेऊन सत्तारोहण करीत आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी १५०पेक्षाअधिकचे लक्ष्य ठेवून निवडणूक प्रचार चालवला होता. याबाबत शहा यांना विचारले असता, ते म्हणाले की, प्रचारादरम्यान कॉंग्रेस एवढ्या खालच्या पातळीवर जाईल, हेमाहीत नव्हते. राज्यात जातीयवादी राजकारण काँग्रेसने केले. परंतु जागरूक जनतेने तो यशस्वी होऊ दिला नाही. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभव स्वीकारताना सांगितले की, गुजराती जनतेने भाजपला धडा शिकवला आहे.सौराष्टÑमध्ये भाजपाला खूपच मोठा झटका बसला. इथे २०१२च्या निवडणुकीत भाजपला ३६ जागा मिळाल्या होत्या. यंदा केवळ २३ जागांवर समाधान मानावे लागले. कॉंग्रेसला सौराष्टÑमध्ये १५ जागांचा फायदा झाला. तथापि, उर्वरित राज्यात या पक्षाला ४ अतिरिक्तजागा मिळाल्या.एक वर्षापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या प्रमाणे मतदारांनी कौल दिला होता तोच पॅटर्न विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवला. ग्रामीण भागाने कॉंग्रेसला तर शहरी भागाने भाजपला पसंती दिली. चार बड्या शहरांत भाजपला ४४ जागा मिळाल्या, तर कॉंग्रेसला ज्या १९ नवीन जागा मिळाल्या. त्यात १६ जागा ग्रामीण भागातील आहेत. काँग्रेस नेते अल्पेश ठाकूरने राधनपूरहून विजय मिळवला. ते म्हणाले की,आम्ही शहरांच्या बाबतीत चुकलो. त्या मतदारांना आमचे मुद्दे समजावून सांगू शकलो नाही.कमी मतदानाचा फायदा-तोटायंदा २०१२च्या तुलनेत मतदान कमी झाले असले तरी भाजपाने त्याचा परिणाम भाजपाने आपल्या व्होट बँकेवर होऊ दिला नाही. या पक्षाला मागील वेळी ४८ टक्के मते मिळाली होती. यावेळी ४९ टक्के मते मिळाली. कॉंग्रेसला २०१२मध्ये ३८ टक्के तर यावेळी मतांचा टक्का वाढून ४१ झाला. काँग्रेसला सहा निवडणुकांनंतर ४0 टक्क्यांहून अधिक मते मिळाली.दहा ठिकाणी विजयाचे अंतर २ हजारपेक्षा कमीनिवडणुकीत किमान १० जागी विजयी व पराभूत उमेदवारामध्ये २ हजारांचे अंतर आहे. कापरडा मतदारसंघात तर १७० मतांनी काँग्रेस उमेदवाराने विजय नोंदवला.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017congressकाँग्रेसBJPभाजपा