शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

भाजपाच्या मुख्यमंत्र्याविरोधात अटलबिहारींची भाची निवडणूक मैदानात; काँग्रेसची खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 09:13 IST

मुख्यमंत्री रमण सिंह यांना राजनांदगांव मतदारसंघातून आव्हान देणार

रायपूर: छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याविरोधात काँग्रेसनं माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भाची करुणा शुक्ला यांना उमेदवारी दिली आहे. रमण सिंह राजनांदगांव मतदारसंघातून निवडणूक लढवतात. यंदा त्यांच्यासमोर करुणा शुक्ला यांचं आव्हान असेल. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह राजनांदगांव मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. यावेळी त्यांना अटल बिहारी वाजपेयी यांची भाची करुणा शुक्ला यांचा सामना करावा लागेल. त्यामुळे रमण सिंह यांच्यासमोर कडवं आव्हान आहे. करुणा यांनी काही वर्षांपूर्वी भाजपाला राम राम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. करुणा शुक्ला 1993 मध्ये पहिल्यांदा भाजपाच्या तिकीटावर आमदार झाल्या. यानंतर त्यांनी संसदेत जांजगीर मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. गेल्या 4-5 वर्षांपासून त्या सातत्यानं भाजपा नेतृत्त्व आणि रमण सिंह यांच्यावर टीका करत आहेत. भाजपा नेतृत्त्वानं फारसं महत्त्व न दिल्यानं नाराज झालेल्या करुणा शुक्ला यांनी 2014 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसनं त्यांना बिलासपूरमधून उमेदवारी दिली. मात्र त्या अपयशी ठरल्या होत्या. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. यातील 18 जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होईल, तर दुसऱ्या टप्प्यात 72 जागांसाठी मतदान घेतलं जाईल. काँग्रेसनं पहिल्या टप्प्यातील 18 जागांपैकी 12 जागांवरील उमेदवार आधीच जाहीर केले होते. यानंतर 6 उमेदवारांची जाहीर काँग्रेसकडून काल जाहीर करण्यात आली. छत्तीसगडमध्ये 12 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातलं मतदान होईल. 11 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.  

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडChhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018ElectionनिवडणूकAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBJPभाजपाcongressकाँग्रेस