"बांगलादेशातील हिंदूंना वाचवा..."; आजीचा दाखला देत प्रियांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 16:48 IST2024-12-16T16:46:25+5:302024-12-16T16:48:42+5:30
प्रियांका गांधी यांनी इंदिरा गांधींच्या इच्छाशक्तीचा उल्लेख करत, आपणही बांगलादेशातील अल्पसंख्याकांचे त्याच पद्दतीन संरक्षण करावे, असे आवाहन मोदी सरकारला केले आहे.

"बांगलादेशातील हिंदूंना वाचवा..."; आजीचा दाखला देत प्रियांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी संसदेत मोदी सरकारला बांगलादेशातील हिंदू, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याकांना वाचवण्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, आज विजय दिवस आहे. या दिवशी आपण पाकिस्तानला धडा शिकवला आणि बांगलादेशची निर्मिती झाली. इंदिरा गांधींचे निर्णयक्षम सरकार आणि शूर सैनिकांनी हा पराक्रम केला होता. त्यांनी इंदिरा गांधींच्या इच्छाशक्तीचा उल्लेख करत, आपणही बांगलादेशातील अल्पसंख्याकांचे त्याच पद्दतीने संरक्षण करावे, असे आवाहन मोदी सरकारला केले आहे.
प्रियांका गांधी सोमवारी लोकसभेतील आपल्या दुसऱ्या भाषणात म्हणाल्या, "मला पहिला मुद्दा मांडायचा आहे की, या सरकारने बांगलादेशातील हिंदू आणि ख्रिश्चनांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला हवा. याच वेळी मला 1971 च्या युद्धात हौतात्म्य आलेल्या शूरवीरांनाही अभिवादन करायचे आहे. आज मी देशातील जनतेलाही अभिवादन करू इच्छिते. कारण भारताने मिळवलेला विजय त्यांच्याशिवाय अशक्य होता. त्यावेळी आम्ही एकटेच होतो आणि आमच्या बंगाली बांधवांचा आवाज कोणीही ऐकत नव्हते. त्या काळात भारतातील जनता एकत्र आली आणि नेतृत्वाच्या पाठीशी उभी राहिली.
खासदार प्रियांका पुढे म्हणाल्या, मला इंदिरा गांधींना अभिवादन करायचे आहे. त्या या देशाची महान शहीद आहेत. कठीण परिस्थितीतही त्यांनी असे नेतृत्व केले, ज्याने या देशाला विजय मिळवून दिला. ती लढाई तत्त्वांची होती. पहिला मुद्दा म्हणजे बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारांवर सरकारने आवाज उठवायला हवा.
आज तो फटोही काढण्यात आला -
प्रियांका पुढे म्हणाल्या, आज सैन्य मुख्यालयातून पाकिस्तानी सैन्याचे सरेंडर दाखवण्यात आलेला फोटोही काढण्यात आला आहे. पाकिस्तानच्या 93 हजार सैनिकांनी भारतीय सैन्य शक्तीपुढे शस्त्रास्त्रे टाकली होती. त्या आत्मसमर्पणाच्या फटोच्या उल्लेखाने आजही पाकिस्तानचा तिळपापड उडतो.