गुवाहाटी : काँग्रेस खासदार गौरव गोगोई, त्यांची ब्रिटिश पत्नी एलिझाबेथ कोलबर्न आणि पाकिस्तानी नागरिक अली तौकीर शेख यांचे घनिष्ठ संबंध आहेत आणि गुप्तचर विभागाकडून (आयबी) मिळालेली माहिती गुप्तपणे शेजारच्या देशात पोहोचविण्यात आली, असा आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी केला.
आसाममध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरमा म्हणाले की, भारतात काम करत असताना एलिझाबेथ यांना अली तौकीर शेखकडून वेतन देण्यात आले. यामुळे परकीय योगदान नियमन कायद्याचे (एफसीआरए) उल्लंघन झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी दावा केला की, गौरव गोगोई यांनी २०१३ मध्ये पाकिस्तानचा अत्यंत गोपनीय दौरा केला होता. तिथे त्यांनी विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण घेतल्याचे सांगितले जाते. या दौऱ्याबाबत खुलासा करण्याचे आवाहन सरमा यांनी केले. अन्यथा, त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप लावले जातील, असेही ते म्हणाले.
सरमा म्हणाले की, गौरव गोगोई, एलिझाबेथ आणि अली तौकीर शेख यांच्यात घनिष्ठ संबंध आहेत. एलिझाबेथ आणि अली शेख हे आंतरराष्ट्रीय कटाचा भाग होते. या लोकांनी भारत सरकारला डावलून स्थानिक संस्थांमार्फत काम केले. हे प्रकरण पोलिस तपासू शकत नसल्याने केंद्रीय गृहखात्याला चौकशीची शिफारस करण्यात आली आहे.
‘गोगोईंच्या मुलांच्या पासपोर्टवर वेगळे धर्म’सरमा यांनी असेही सांगितले की, गोगोई यांनी डिसेंबर २०१३ मध्ये लग्नापूर्वी पाकिस्तानचा गोपनीय दौरा केला होता. ते तिथे १० दिवस राहिले, तेव्हा एलिझाबेथ या भारतातच राहत होत्या. त्यावेळी गौरव यांचे वडील तरुण गोगोई आसामचे मुख्यमंत्री होते. गौरव हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राहत होते. सरमा यांनी दावा केला की, पाकिस्तानहून परतल्यानंतर आणि खासदार झाल्यानंतर गोगोई यांनी लोकसभेत लष्करी तयारी, सुरक्षा बाबी, संरक्षण उपकरणे, अणुऊर्जा प्रकल्प, हेरगिरी, काश्मीर अशा मुद्द्यांवर प्रश्न विचारले होते. ते म्हणाले, गौरव यांचा मुलगा भारतीय पासपोर्टमध्ये त्याचा धर्म हिंदू म्हणून लिहित असे, परंतु नागरिकत्व बदलल्यानंतर त्याने तसे करणे बंद केले. त्यांच्या मुलीच्या ब्रिटिश पासपोर्टमध्ये ख्रिश्चन उल्लेख केला आहे.
‘गोगोईंच्या पत्नीचा 'लीड पाकिस्तान'शी संबंध’
सरमा म्हणाले, एलिझाबेथ यांनी शेख यांच्या पाकस्थित 'लीड पाकिस्तान' या संघटनेत काम केले होते. त्यानंतर त्यांची भारतात बदली झाली आणि त्या संघटनेत कार्यरत होत्या. परंतु, त्यांचा पगार अली तौकीर शेख देत होता. ‘लीड पाकिस्तान’ या संघटनेने 'लीड इंडिया'ला पैसे पाठविले आणि ‘लीड इंडिया’ने एफसीआरए नियम डावलून एलिझाबेथ यांना पैसे दिले. पाकिस्तानी एजन्सी कोणत्याही भारतीय संस्थेला देणगी देऊ शकत नाही. सरमा यांनी दावा केला की, एलिझाबेथ यांनी लीड इंडियासोबत काम करताना सहा वेळा इस्लामाबादचा दौरा केला. तर, दुसऱ्या एनजीओमध्ये सहभागी झाल्यानंतर त्या तीन वेळा पाकिस्तानला गेल्या होत्या.
सी-ग्रेड सिनेमापेक्षाही वाईट : गौरव गोगोईकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोगोई यांनी सरमांची पत्रकार परिषद सी-ग्रेड सिनेमापेक्षाही वाईट आणि सुपर फ्लॉप असल्याची टीका केली. मला दिल्ली आणि आसाममधील पत्रकारांबद्दल दया येते. कारण, त्यांना शतकातील सर्वात वाईट 'फ्लॉप पत्रकार परिषद' सहन करावी लागली. हे सी-ग्रेड सिनेमापेक्षाही वाईट, हास्यास्पद आहे असे ते म्हणाले.
Web Summary : Assam CM Himanta Biswa Sarma alleges Congress MP Gaurav Gogoi has links to Pakistan through his wife and an associate, accusing them of sharing confidential information and FCRA violations. Gogoi denies claims.
Web Summary : असम के मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा ने कांग्रेस सांसद गौरव गोगोई पर उनकी पत्नी और एक सहयोगी के माध्यम से पाकिस्तान से संबंध होने का आरोप लगाया, गोपनीय जानकारी साझा करने और एफसीआरए उल्लंघन का आरोप लगाया। गोगोई ने आरोपों का खंडन किया।