शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

'माझा मित्र वर गेलाय, मी त्याच्याकडे जातोय...';काँग्रेस आमदाराच्या 17 वर्षीय मुलाची गोळी झाडून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 8:12 PM

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.

जबलपूर:मध्य प्रदेशातील जबलपूरच्या बारगीचे काँग्रेस आमदार संजय यादव यांच्या मुलाने गुरुवारी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. विभव यादवने वडिलांच्या परवाना असलेल्या बंदुकीने स्वत:वर गोळी झाडून जीव संपवले. अवघ्या 17 वर्षीय मुलाने हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. पण, यामागचे कारण आता समोर आले आहे.

विभवने स्वतःवर गोळी झाडल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दरम्यान, पोलिसांना घटनास्थळावरुन 4 पानी सुसाईड नोट सापडली आहे. त्यात त्याने आपल्या आत्महत्येचे कारण सांगितले असून, आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरण्यात आलेले नाही. 

सुसाईड नोटमध्ये काय आहे?एसपी रोहित कासवानी यांनी सांगितले की, विभव सत्य प्रकाश हा मदन महल स्कूलमध्ये 12वीत शिकत होता. तो मानसशास्त्राचा विद्यार्थी होता. घटनास्थळवार पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली, त्याचा संपूर्ण तपशील पोलिसांनी सांगितला नसला तरी, त्यातील काही भाग समोर आला आहे. सुसाईड नोटमध्ये विभवने लिहिले की, 'आई-वडील खूप चांगले आहेत. माझे सर्व मित्र खूप छान आहेत. पण, माझा एक अत्यंत जवळचा मित्र या जगात नाही, तो वर गेलाय. आता मी पण त्याच्याकडे जात आहे.' ही सुसाईड नोट त्याने आपल्या 5 मित्रांना मेसेज केली होती. त्यांना सांगितले की तुम्ही लोक खूप चांगले आहात, आता मी निघतो.

घटनेदरम्यान नोकर घरात एकटाच होताआमदार संजय यादव यांचा लहान मुलगा विभव (17) ने राहत्या घरात स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेदरम्यान घरात तो आणि नोकर होते. आई सीमा काही कामानिमित्त भोपाळला गेली होती, तर वडील बैठकीसाठी बाहेर गेले होते. मोठा मुलगा समर्थ यादवदेखील पेट्रोल पंपावर गेला होता. दुपारी 1.30 वाजता घराच्या पहिल्या मजल्यावरून पिस्तुलातून गोळी झाडल्याचा आवाज आला. नोकर ताबडतोब आला तेव्हा विभव रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तात्काळ भंडारी रुग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

संजय यादव पहिल्यांदाच आमदार झाले आहेत2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्या प्रतिभा सिंह यांचा पराभव करून संजय यादव पहिल्यांदा आमदार झाले. घटनेनंतर काँग्रेसचे राज्यसभा खासदार विवेक तनखा, भाजप आमदार सुशील तिवारी उर्फ ​​इंदू तिवारी, काँग्रेस आमदार तरुण भानोत हे आमदार संजय यादव यांच्या घरी पोहोचले.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीcongressकाँग्रेस